शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरीत बुलढाण्याच्या रामाला अकोल्याच्या सूरजची साथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 18:13 IST

बुुलढाण्यातून येऊन येथील दुचाकींवर डल्ला मारणाऱ्या २० वर्षीय सराईत वाहन चोराला राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

अमरावती :

बुुलढाण्यातून येऊन येथील दुचाकींवर डल्ला मारणाऱ्या २० वर्षीय सराईत वाहन चोराला राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याने येथील वाहन चोरीच्या तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून १.२० लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अकोला येथील सूरज ठाकूर याच्या मदतीने ती वाहने चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे. रामा ऊर्फ रामेश्वर एकनाथ सावळे (२०, रा. बोरखेड धाड, बुलढाणा), असे अटक आरोपीचे नाव आहे.फ्रेजरपुरा येथील आकाश कांबळे यांची दुचाकी एका मेडिकलसमोरून चोरीला गेली होती. त्यावरून फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हादेखील नोंदविला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने राजापेठ पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून रामा ऊर्फ रामेश्वर सावळे याला ताब्यात घेतले असता, त्याने फ्रेजरपुरा ठाण्यात नोंद गुन्ह्यासह अन्य काही दुचाकी चोरीचे गुन्हे त्याचा मित्र सूरज ठाकूर, रा. अकोला याच्यासह केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. पीसीआरदरम्यान आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वातील ‘टीम राजापेठ’ने ही कारवाई केली. अंमलदार मनीष करपे, रवी लिखितकर, दानिश शेख, सागर भजगवरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू असताना त्यातील बोटांवर मोजण्याइतपत गुन्ह्यांची उकल होत आहे.