शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर रायझिंग स्टार’मधून चमकले उद्याचे ‘सुपरस्टार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 22:41 IST

आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही.

ठळक मुद्देकलर्स व लोकमत समूहाचा संयुक्त उपक्रम : बहारदार सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध; कार्यक्रमाला

उत्स्फूर्त प्रतिसादआॅनलाईन लोकमतअमरावती : आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही. आर्थिक, कौटुंबिक, तर कधी व्यासपीठच न मिळाल्यामुळे अनेक कलावंत समाजासमोर येतच नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन जनसामान्यांतील सुप्तगुणांना वाव देऊन त्यांच्या कलाकौशल्य प्रतिभेला नवे पंख देण्यासाठी लोकमत समूह नेहमीच आघाडीवर असतो. विविध कार्यक्रम, स्पर्धा, टॅलेंट शो आयोजित करून या ‘उद्या’च्या सुपरस्टार्संना प्रकाशझोतात आणले जाते. सुरांची देणं लाभलेल्या प्रतिभावान गायकांना एक नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी 'लोकमत' आणि कलर्स वाहिनी आगळा-वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. ‘सूर रायझिंग स्टार’र् ेचे असे त्याचे नाव. कलर्स व लोकमतद्वारे आयोजित ही गायन स्पर्धा अभियंता भवन, शेगाव नाका चौक, अमरावती येथे पार पडली.यामध्ये ४ वर्षा पुढील मुले-मुली, स्त्री-पुरुष आदींचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी टिप्स म्युझिकल कंपनीचे सिंगर व म्युझिक डायरेक्टर मुमताज रफी व म्युझिक टिचर संगीता गावंडे उपस्थित होते. कार्यक्रमात अनेक स्पर्धकांनी विविध प्रकारची गाणी सादर केली. प्राथमिक फेरीतील निवडक १५ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. स्पर्धकांनी आपल्या गाण्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये ‘मेरे ढोलना’,‘आओ ना गले लगाओना’, ‘सुन हर है तु’, ‘गारवा’, ‘रिमझिम गिरे सावन’.विशेष म्हणजे या प्रयत्नांना यंदा साथ मिळाली आहे, ती कलर्स वाहिनीची. मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांची निर्मिती करून छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या घराघरांमध्ये कलर्सने बोलबाला निर्माण केला आहे. शुद्ध कौटुंबिक संस्कारक्षम कार्यक्रमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासोबत सामाजिक बांधीलकीचेही अनेक उपक्रम राबविले जातात.उपस्थितांमधून लडी ड्रॉ काढण्यात आला त्यात दीपक घाटोळ व अफरीन खान विजेते ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष शिंगोरे यांनी केले. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.‘सूर रायझिंग स्टारचे’ या निमित्ताने कलर्स वाहिनी घेऊन येत आहे. भारतातील पहिल्या लाईव्ह रिअ‍ॅलिटी शोचे दुसरे पर्व, ज्याद्वारे मोडल्या जाणार विचारांच्या चौकटी, भाषा, जात, आर्थिक स्थिती, धर्म अशा विविध चौकटींची आज काहीही गरज नाही. अशा चौकटींचे बंधने झुगारून आपले टॅलेंट जगासमोर आणणाºया गायकांना या चौकटी मोडण्यास मदत म्हणून या शोच्या माध्यमातून तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपºयातून लाईव्ह व्होटिंग करू शकता. यामध्ये साथीला आहेत देशातील तीन सुप्रसिद्ध महारथी परीक्षक गायक व संगीतकार शंकर महादेवन, गायिका मोनाली ठाकूर आणि अभिनेता व गायक दिलजित दोसांज. परंतु खरे परीक्षक तर कलर्स वाहिनी पाहणारे देशातील १३० कोटी भारतीयच असणार आहेत. मग या सिझनमध्ये केवळ विचारांच्या चौकटीच नाही मोडल्या जाणार, तर देशातील प्रतिभावान गायकांचे नशीबही पालटणार आहे. कलर्स वाहिनीवर २० जानेवारीपासून दर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता सूर झाली आहे. देशातील एकमेव लाईव्ह सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो ‘सूर रायझिंग स्टार’.