लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : या आठवड्यात राज्याच्या कृषी मंत्र्यांचा जिल्हादौरा झाला असला तरी युरियाचा घोळ निस्तरण्याचे नाव नाही. यंदाच्या खरिपात ऑगस्ट महिन्यापर्यंत २९ हजार ३२९ मे.टन युरियाच्या पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात त्यातुलनेत २६ हजार १७२ मे.टन युरियाचा पुरवठा जिल्ह्यात झालेला आहे. त्यामुळे अद्यापही नियोजनाच्या तुलनेत ३१४९ मे.टनाचा तुटवडा आहेच.पिकाला आता युरियाची आवश्यकता असताना शेतकऱ्यांना ही तूट महागड्या खताने भरुन काढावी लागत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार गतवर्षीच्या हंगामातील २३०५ मे.टन युरियाचा साठा डीलरकडे शिल्लक होता.आतापर्यत २८ हजार ४७७ मे.टन साठा उपलब्ध झालेला आहे. यामधील २३ हजार ५८० मे.टन युरियाची विक्री झाल्याने सद्यस्थितीत ४८९७ मे. टन साठा शिल्लक असल्याचे प्रशासनाद्वारा सांगण्यात आले. प्रत्यक्षात हा साठादेखील शेतकऱ्यांच्या मागणीच्या तुलनेत जेमतेमच आहे. त्यामुळे काही दुकानात खत उपलब्ध तर काही दुकानांत खतांचा साठा उपलब्ध नसल्याची जिल्हास्थिती आहे.यंदाच्या हंगामासाठी कृषी आयुक्तालय स्तरावरुन जिल्ह्यासाठी १ लाख १ हजार ८३० मे. टन रासायनिक खतांचा साठा मंजूर करण्यात आला होता. त्यातुलनेत ऑगस्ट महिन्यापर्यंत ८९ हजार ६१० मे.टन खतांचे नियोजन करण्यात आले. आतापर्यत १ लाख १० हजार ८० मे.टन खतांचा पुरवठा जिल्ह्याला झालेला आहे. यामध्ये डीएपी, संयुक्त खते, एसएसपी, अमोनियम सल्फेट व मिश्र खतांचा पुरवठा मागणी व नियोजनापेक्षा जास्त झालेला आहे.सर्व खतांचा ४८,२३७ मेट्रिक टन साठा शिल्लकजिल्ह्यात गतवर्षीच्या हंगामातील २० हजार ६७ मे.टन साठा डिलरकडे शिल्लक आहे. यामध्ये आतापर्यत १ लाख ३० हजार १४७ मे.टन साठ्याचा पुरवठा व शिल्लक असलेला साठा मिळून जिल्ह्याला खते उपलब्धी झाली. त्या तुलनेत ८१ हजार ९१० मे.टन साठ्याची आतापर्यंत विक्री झालेली असल्याने जिल्ह्यात सद्यस्थितीत ४८ हजार २३७ मे.टन रासायनिक खतांचा साठा शिल्लक असल्याची माहिती कृषी विभागानो दिली.
ऑगस्टमध्ये युरियाचा ३,१४९ मे.टन पुरवठा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST
आतापर्यत २८ हजार ४७७ मे.टन साठा उपलब्ध झालेला आहे. यामधील २३ हजार ५८० मे.टन युरियाची विक्री झाल्याने सद्यस्थितीत ४८९७ मे. टन साठा शिल्लक असल्याचे प्रशासनाद्वारा सांगण्यात आले. प्रत्यक्षात हा साठादेखील शेतकऱ्यांच्या मागणीच्या तुलनेत जेमतेमच आहे. त्यामुळे काही दुकानात खत उपलब्ध तर काही दुकानांत खतांचा साठा उपलब्ध नसल्याची जिल्हास्थिती आहे.
ऑगस्टमध्ये युरियाचा ३,१४९ मे.टन पुरवठा कमी
ठळक मुद्देटंचाई निस्तरेना : काही दुकानांमध्येच स्टॉक उपलब्ध