शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

दारू दुकानापुढेच "सुंदरकांड"

By admin | Updated: April 23, 2017 00:21 IST

मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या विवेकानंद कॉलनी वासींयांनी दारू दुकान हटविण्यासाठी देव हनुमानाला साकडे घातले.

अभिनव आंदोलन : मद्यपींच्या त्रासाला कंटाळले नागरिक अमरावती : मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या विवेकानंद कॉलनी वासींयांनी दारू दुकान हटविण्यासाठी देव हनुमानाला साकडे घातले. शनिवारी विवेकानंद कॉलनीतील रहिवाश्यांनी दारू दुकानासमोरच "सुंदरकांड" या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून दारू दुकान हटविण्यासंदर्भात असा आगळा वेगळा विरोध नागरिकांनी विरोध केला. सुप्रीम कोटाने दिलेल्या मद्यविक्रीच्या निर्णयाचे अमरावतीकरांनी स्वागत केले. मात्र, महामार्गावरील सर्वच दुकाने बंद झाल्याने मद्यपींनीअंतर्गत मार्गावरील मद्यविक्री केंद्रावर धाव घेतली. परिणामी अंतर्गत मार्गावरील मद्यविक्री प्रतिष्ठानावर गर्दी वाढली. त्यामुळे अंतर्गत परिसरातील नागरिकांना त्रास सुरु झाला. असाच प्रकार विवेकानंद कॉलनीत घडला. परिसरातील वाईन अ‍ॅन्ड वाईन या दारू दुकानाजवळील रहिवाशांना मद्यपींचा त्रास सुरू झाला. सकाळी दुकान उघडल्यापासून तर रात्री ११ वाजता दुकान बंद होईपर्यंत दारु दुकानावर मद्यपींची वर्दळ सुरु होते. दारु दुकानात येणारे ग्राहक त्यांची वाहने अस्तव्यस्त स्थितीत ठेवत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करणेही कठीण झाले. त्यातच वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन कर्कश हार्नमुळे नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे. दररोज मद्यपींचे वादविवाद, आरडाओरड, हाणामारीच्या प्रसंगाने नागरिकांची शांतता भंग झाली. दारू पिऊन उलट्या करणे, प्लास्टिकचे ग्लास फेकून घाण करणे, असे प्रकार नागरिकांना सोसावे लागत आहे. या परिसरात तीन मंदिर आहेत. नामांकित डॉक्टरांचे हॉस्पिटल्स आहेत. स्कूल बसेसचे आवागमन सुरू असते. असे प्रकार घडत असताना प्रशासनकडून मद्यविक्रेत्यालाच सरंक्षण दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शनिवारी सकाळी नागरिकांनी "सुंदर कांड" या धार्मिक कार्यक्रमातून प्रशासनाचे लक्ष वेधले. रहिवाशांनी या मद्य विक्री प्रतिष्ठानासमोरच "सुंदर कांडाचे" आयोजन करून अभिनव आंदोलन केले. यामध्ये महिलांचा सर्वाधिक सहभाग होता. महिलांनी काही नागरिकांना दुधाचे वाटप करून दारू ऐवजी दुध प्या,चा संदेश दिला. प्रशासनाने दारू दुकान हटविण्यासंदर्भात पाऊल उचलले नाही, तर नागरिक तीव्र निषेध नोंदवतील. आयोजनासाठी माजी आमदार संजय बंड, नगरसेविका जयश्री डाहाके, राधा कुरील, रमा छांगाणी, मीनल हिवसे, वैशाली कडू, माधुरी महल्ले, स्वाती देशमुख, लता सोहोनी,आरती बापट, अंकीत देशमुख, राजू कुरील यांच्यासह शेकडो रहिवाशांनी सहभाग नोंदविला.