शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात १० फुटांपर्यंत भूजलात कमी उन्हाळाअखेरची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 16:11 IST

विभागात गेल्या हंगामात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाच्या तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत यंदाच्या उन्हाळ्यात कमी आलेली आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : विभागात गेल्या हंगामात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाच्या तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत यंदाच्या उन्हाळ्यात कमी आलेली आहे. यापैकी पाच तालुक्यात भुजलस्तर तीन मीटरपेक्षा जास्त खाली गेला. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा उन्हाळाअखेर ६८० निरीक्षण विहिरींच्या नोंदीनंतर हे निष्कर्ष नोंदविण्यात आले.  राज्यातील भूगर्भीय स्थिती पाहता, ८२ टक्के भूभाग हा ‘बसाल्ट’ या कठीण पाषाणाने व्यापलेला आहे. यात पाणी साठविण्याची क्षमता फार कमी झालेली आहे. भेगा व सांधे निर्माण झाल्याने या पाषाणात साठवण क्षमता निर्माण होते. भूपृष्ठीय रचना व भूगर्भीय स्थितीवर झालेल्या पर्जन्यमानाचे भुजलात रूपांतर होणे पूर्णपणे अवलंबून असते. गतवर्षी नैसर्गिक पुर्नभरण झालेले नसले तरी अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांमुळे स्थिती समाधानकारक आहे.सद्यस्थितीत २५ तालुक्यांची ० ते १ मीटरपर्यंत भूजल पातळी कमी झाली. यात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १२ व अमरावती जिल्ह्यातील ८ तालुके आहेत. १५ तालुक्यांची भूजल पातळीत १ ते २ मीटरपर्यंत कमी आली. यात सर्वाधिक ६ तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आहे. अमरावती २, अकोला ४  वाशिम २ व बुलडाणा जिल्ह्यातील १ तालुक्याचा समावेश आहे. २ ते ३ मीटरपर्यत ११ तालुक्यांच्या भूजलात कमी आली. यात सर्वाधिक सात तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आणि अकोला व अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी २ तालुक्यांचा समावेश आहे. तीन मीटरपेक्षा जास्त भूजलात कमी पाच  तालुक्यात आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ३ व अमरावती जिल्ह्यातील २ तालुक्याचा समावेश आहे.

एकूण २८ टक्के क्षेत्र पाणवहनराज्यातील मुख्य नद्यांच्या खो-याची १,५३१ पाणलोट क्षेत्रात विभागणी करण्यात आली व याचीदेखील पुन्हा तीन क्षेत्रात विभागणी करण्यात आली. यामध्ये २८ टक्के म्हणजेच ८६ हजार १५३ चौ.किमी पाणवहन क्षेत्र आहे. ४४ टक्के म्हणजेच १ लाख ३५ हजार ३८३ चौ. किमी पुनर्भरण क्षेत्र, तर २८ टक्के म्हणजेच ८६ हजार १५३ चौ.किमी हे साठवण क्षेत्र आहे व यात ८२ टक्के भाग हा बेसाल्ट पाषाणाचा असल्याने त्यात पाणीसाठवण क्षमता फारच कमी प्रमाणात आहे.

- पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा किमी पाऊस झाल्याने नैसर्गिक भूजल पुनर्भरण झालेले नाहीत. जलयुक्तच्या कामांमुळे ब-यापैकी स्थिती आहे. पाच तालुक्यात शास्त्रोक्त पद्धतीने जलसंधारणाचे नियोजन हवे.डॉ. पी.व्ही. कथनेउपसंचालक, जीएसडीए

टॅग्स :Amravatiअमरावती