सारांश सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:12 AM2021-05-07T04:12:50+5:302021-05-07T04:12:50+5:30

शिवारातून मुलीला पळविले अमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील सर्फाबाद शिवारातून एका मुलीला फूस लावून पळविण्यात आले. २ मे रोजी पहाटे ...

Summary Summary News | सारांश सारांश बातम्या

सारांश सारांश बातम्या

googlenewsNext

शिवारातून मुलीला पळविले

अमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील सर्फाबाद शिवारातून एका मुलीला फूस लावून पळविण्यात आले. २ मे रोजी पहाटे ५ च्या सुमारास ही घटना घडली. चांदूरबाजार पोलिसांनी आरोपी आकाश कासदेकर (२०, रा. सर्फाबाद शिवार) विरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

अचलपुरातील हॉटेलमधून साहित्य लंपास

अमरावती : अचलपूर येथील एका हॉटेलमधून केबल, २७ प्लास्टिक खुर्ची, सिलिंडर, मिक्सर असा एकूण १८ हजार ८०० रुपयांचे साहित्य लंपास करण्यात आले. २ मे रोजी ही घटना घडली. अचलपूर पोलिसांनी याप्रकरणी रमेश चंदेले (चावलमंडी) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

परतवाड्यातील खून प्रकरणात आरोपी किती?

अमरावती : परतवाडा येथील छोटाबाजार परिसरात विकी पवार (रा. रविनगर) याची ३ मे रोजी दुपारी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. यात शेख मुराद शेख इस्माईल याला अटक करण्यात आली. यात भादंविचे कलम ३०२ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अन्य आरोपी पसार आहेत.

---------

टेंभुर्णी येथे तरुणाला मारहाण

अमरावती : चांदूररेल्वे तालुक्यातील टेंभुर्णी येथील गौरव शेळके (२३) याला हातोडीने मारहाण करण्यात आली. वाद सोडविण्यास गेला असता, २६ एप्रिल रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी चांदूररेल्वे पोलिसांनी आरोपी अरविंद वडस्करविरूद्ध ३ मे रोजी गुन्हा दाखल केला.

---------------

धामणगावच्या महिलेची ऑनलाईन फसवणूक

अमरावती : धामणगाव रेल्वे येथील एका महिलेची ८१ हजार २३७ रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. १ मे रोजी एका अनोळखी इसमाने ओटीपी मागून फोन-पे अ‍ॅपमधून ती रक्कम परस्पर काढून घेतली. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी ९८८३४५८७९३ व ७३१८६५८३३० या मोबाईल क्रमांकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

महिलेवर चाकूने हल्ला

अमरावती : तिवसा येथील एका ३५ वर्षीय महिलेला चाकूने मारहाण करण्यात आली. ३ मे रोजी घरगुती वादातून हा प्रसंग उद्भवला. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी आरोपी दीपक घोंगडे (३५, दुर्गा चौक, तिवसा)विरूद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

निंबोरा बोडखा येथील चार घरांत चोरी

अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोरा बोडखा येथे २ मे रोजी रात्री चार घरे फोडण्यात आली. तब्बल १ लाख २२ हजारांचा ऐवज चोरीला गेला. तेथील एका ६३ वर्षीय महिलेच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख असा १ लाख ७ हजार ५०० रुपयांचा माल, तेथीलच ज्योती बढीये व भीमराव डोंगरे यांच्या घरातून प्रत्येकी ५ हजार रुपये रोख, तर गजानन पांडे यांच्या घरातून ४५०० रुपये रोख लांबविण्यात आली. मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी याप्रकरणी ३ मे रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

फत्तेपूर शिवारातून एरंडीचे पोते लांबविले

अमरावती : वरूड तालुक्यातील फत्तेपूर शिवारातून एरंडीचे तीन पोते लंपास करण्यात आले. २९ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वरूड पोलिसांनी याप्रकरणी ३ मे रोजी अज्ञातविरूद्ध गुन्हा दाखल केला.

------------

कुंभी वाघोली येथून मुलीला पळविले

अमरावती : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका १७ वर्षीय मुलीला पळवून नेण्यात आले. २ मे रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी आरोपी प्रमोद हरसुले (२५, रा. सोनापूर, ता. चिखलदरा) विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

---------------

बोराळा येथे वृद्धाला मारहाण

अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बोराळा येथे रामराव भिवटे (६५) यांना काठीने मारहाण करण्यात आली. भिंत बांधण्याच्या कारणावरून ३ मे रोजी हा वाद झाला. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी विकी भिवटे (२४, बोराळा)विरूद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

झिल्पी गावाजवळ ट्रॅक्टर ट्रॉली जप्त

अमरावती : धारणी तालुक्यातील सुसर्दा रोडवरील झिल्पी गावाजवळ एमपी ६८ अ ३८९२ या क्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉली एक ब्रास रेतीसह जप्त करण्यात आली. ३ मे रोजी रात्री ही कारवाई धारणी पोलिसांकडून करण्यात आली. धारणी पोलिसांनी शामलाल मावस्कर (गिरमिटी, एमपी) व शेख फईम (२५, रा. देडतलाई) विरुदध गुन्हा नोंदविला.

-----------

इतवारा बाजारातून हवी कारवाई

अमरावती : इतवारा बाजार परिसरात अत्यावश्यक सेवेचे दुकान सोडून इतर दुकान सुरू असल्याने एका आस्थापनेकडून १०,००० रुपये दंड वसूल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी ही कारवाई झाली. मात्र अद्यापही इतवारा बाजारातील अनेक दुकाने सकाळी ११ नंतर अव्याहतपणे सुरू असतात. त्यांचेवर कारवाई करण्याची गरज आहे.

---------------

मोर्शी शहरात कोरोना लॉकडाऊनचे उल्लंघन

अमरावती : सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, म्हणून दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची मुभा दिली आहे. मोर्शी येथील काही दुकानदार प्रशासनाला न जुमानता दुकानाचे शटर उघडे करून व्यवसाय करीत आहे. यात कापड दुकानदार, रेडिमेड ड्रेसेस, जनरल स्टोर्स, जोडे व चपलांची दुकाने, स्टील दुकाने हार्डवेअर दुकाने सर्रास नियमांचे उल्लंघन करीत आहे.

------------------

मोर्शी, वरूडमध्ये आंबिया बहराला गळती

अमरावती : मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बागेतील आंबिया बहराला गळती लागली असताना संत्रा झाडांची पाने पिवळी पडून गळत आहे. सोबतच संत्राच्या झाडांच्या फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे. या अज्ञात रोगामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

--------------

मोबाईलवरून ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले

अमरावती : बँक व्यवस्थापक बोलतो, लंडनमधील इस्टेटचे पैसे तुमच्या खात्यात पाठवितो, लॉटरी लागली, त्यासाठी जीएसटी भरावी लागेल, अशी नानाविध बतावणी करून ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण अधिक वाढले आहे. शहराच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हे फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे.

------------------

Web Title: Summary Summary News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.