शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:09 IST

अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसींचे आरक्षण कायम ठेवावे, या मागणीकरिता माळी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना ...

अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसींचे आरक्षण कायम ठेवावे, या मागणीकरिता माळी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना इतर मागास वर्गाचे राजकीय आरक्षण पुन:स्थापित करण्याकरिता निवेदन देण्यात आले. यावेळी माळी महासंघाचे युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष सुयश श्रीखंडे, पूर्व जिल्हाध्यक्ष दिनकर सुंदरकर, पश्चिम जिल्हाध्यक्ष संतोष चिंचोळकर, वंदना मडघे, पूजा हाडोळे, प्रज्वल पाटील, अजिंक्य काळे, अंकित रामेकर, सारंग गुंजरकर, प्रणय आजनकर, नरेंद्र जामोदकर उपस्थित होते.

-------------------

फोटो पी २७ रोटरी

वडाचे रोप लावून पूजन

अमरावती: रोटरी क्लब अमरावतीच्यावतीने वटपौर्णिमेचे औचित्य साधून सर्व रोटेरियन महिला सदस्यांनी वडाचे रोप लावून पूजन केले. क्लबचे कोषाध्यक्ष संजय छांगाणी, सुगंधा देशमुख, चारुदत्त देशमुख, रामप्रकाश गिल्ड, संजय छांगाणी, डॉ. संगीता कडू, डॉ. वसुधा बोंडे, अनुराधा व्यवहारे, संध्या उंबरकर उपस्थित होत्या.

-------------------

मनपात राजर्षी शाहू महाराज जयंती

अमरावती : महापौर चेतन गावंडे यांच्या हस्‍ते राजर्षी शाहू महाराज यांच्‍या प्रति‍मेस विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी ११ वाजता हारार्पण करण्‍यात आले. उपमहापौर कुसुम साहू, स्‍थायी समिती सभापती सचिन रासने, सभागृहनेता तुषार भारतीय, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, अतिक्रमण पथकप्रमुख अजय बन्‍सेले, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

-------------------

महावितरण कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

धामणगाव रेल्वे : देवगाव ते धामणगाव रेल्वे मार्गाने आसेगावनजीक अज्ञात वाहनचालकाच्या धडकेत महावितरणचा कर्मचारी ठार झाला. २४ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. विशाल संजय दळवी (२७, रा. शास्त्री चौक धामणगाव रेल्वे) असे मृताचे नाव आहे. ड्युटीवर जात असताना एमएच २९ एजी ८२१८ क्रमांकाच्या त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे रस्त्यावर कोसळून त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाला. त्यांना धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी २५ जून रोजी रात्री उशिरा दत्तापूर पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३०४ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास दत्तापूर पोलिस करीत आहेत.

--------

मोर्शी तालुक्यातून दुचाकी लंपास

मोर्शी : आष्टगाव ते चांदूर बाजार मार्गावर आष्टगाव शिवारात भास्कर गोपाळराव उमाळे (६४, रा. आष्टगाव) यांची एमएच २७ एएम ८१०८ क्रमांकाची दुचाकी १६ जून रोजी लंपास करण्यात आली. याप्रकरणी त्यांनी २५ जून रोजी तक्रार नोंदविली. मोर्शी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

---------------

बैल उशिरा आणल्यावरून मित्राला मारहाण

मोर्शी : मध्य प्रदेशातील पाटनाका येथून घेतलेला बैल उशिरा का आणला, असे म्हणत प्रफुल धर्मदास वासनिक (३२) यांना मारहाण करण्यात आली. मनीमपूर येथे २४ जून रोजी ही घटना घडली. मोर्शी पोलिसांनी २५ जून रोजी शेख कलीम उर्फ बबलू शेख कलीम (३५, रा. मोर्शी) व शेख हमीद शेख हनीफ (४०, रा. सालबर्डी) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

-----------------

रेशनचे धान्य मागितले, आईला मारहाण

वरूड : रेशन धान्यातील गहू मागणाऱ्या आईला काठीने मारहाण करणाऱ्या मुलाविरुद्ध वरूड पोलिसांनी गुन्हा नोंदविला. सातपुडा जिनिंग परिसरात ही घटना घडली. संदीप शालिकराम युवनाते (४०) असे आरोपी मुलाचे नाव आहे. सुशीला शालीकराम युवनाते (५५) यांना त्याने मारहाण केली.

--------------

दर्यापुरात साडी सेंटरमधून ४८ हजारांचा ऐवज लंपास

दर्यापूर : शहरातील गांधी चौक बनोसा येथील एका साडी सेंटरमधून तीन महिला व एका मुलीच्या टोळक्याने पर्स लंपास केल्याची तक्रार दर्यापूर पोलीस ठाण्यात २५ जून रोजी नोंदविण्यात आली. या पर्समध्ये एकूण ४८ हजार ६०० रुपयांचा ऐवज होता.

पोलीस सूत्रांनुसार, तीन महिला व एक मुलगी साडी सेंटरमध्ये आले. त्यांनी टॉवेलची खरेदी केली. यापैकी एक महिला काऊंटरवर पैसे देण्यास गेली. त्यावेळी अन्य एक महिला ३२ वर्षीय फिर्यादीच्या पुढे उभी राहिली, तर अन्य एकीने काही साड्या निवडल्या. मात्र, साड्या खरेदी न करता हे टोळके निघून गेले. त्यानंतर फिर्यादीने आईला काउंटरवर रुमाल ठेवण्यास सांगितले असता, तेथील पर्स गहाळ झाल्याचे लक्षात आले. त्यामध्ये दोन मोबाईल, कानातील सोन्याचे पाच ग्रॅम दागिने व १५ हजार रुपये असा एकूण ४८ हजार ६०० रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी भादंविचे कलम ३८०, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

-----------------

शेंदूरजनाघाट शिवारातून पाईप लंपास

शेंदूरजनाघाट : संजय श्यामराव डहाके (४९, रा. शेंदूरजनाघाट) यांच्या शेतातून प्रत्येकी २०० रुपये किमतीचे आठ पाईप अज्ञात चोरट्याने २१ जून रोजी रात्री लंपास केले. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी २५ जून रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------

खेड पिंपरी शिवारात शेतकऱ्याला मारहाण

मंगरूळ चव्हाळा : शेेताच्या धुऱ्यावरून ट्रॅक्टर का नेला, असे विचारले असता सचिन शंकरराव बबन (३४) याने अक्षय किसनराव कडू (२६) याला काठीने खांद्यावर मारले व शिवीगाळ केली. याप्रकरणी मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी २५ जून रोजी गुन्हा नोंदविला. याच प्रकरणात सचिन बन यांनी अक्षय कडू, किसनराव भाऊराव कडू (५०) व भरत पुंडलिक टेकाम (१८, सर्व रा. खेड पिंपरी) यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तिघांनी गोठा पाडावा लागतो, असे म्हणत शिवीगाळ केली व अवजारे पाण्याच्या खड्ड्यात टाकली. यानंतर लाथाबुक्क्यांनी व बांबूच्या काठीने मारहाण केली, असे तक्रारीत नमूद आहे. मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

--------------

दुचाकीवरील मायलेकाला चारचाकीची धडक

नांदगाव पेठ : माहुली जहांगीर येथे पाहुणे म्हणून आलेल्या माय-लेकाला अंबाडा येथे परत जात असताना चारचाकी वाहनाने धडक दिली. त्यांच्यावर चालकाने त्यांना अमरावती येथे आणून खासगी रुग्णालयात दाखल केले. २४ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास एमएच २७ सीएफ ६१०५ क्रमांकाच्या दुचाकीने परत जात असताना हा अपघात घडला. याप्रकरणी नरेंद्र खासबागे (५७, रा. माहुली जहागीर) यांच्या तक्रारीवरून माहुली पोलिसांनी एमएच ४२ के ९७९६ क्रमांकाच्या चारचाकीच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. वैशाली किशोर भेले व यश किशोर भेले (२०, रा. अंबाडा, ता. मोर्शी) अशी जखमींची नावे आहेत.

-------------

मद्यपी दुचाकीचालकाला अपघात

परतवाडा : कविठा मार्गावर एमएच २७ बीएम ३५७२ क्रमांकाच्या दुचाकीने एमएच २७ एव्ही ९४२९ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीचालक बळीराम जगराजी झामरे (५०, रा. राजाकोट हरिसाल, ता. धारणी) हा स्वतः अपघातात जखमी झाला. त्याने मद्यपान केले असल्याने परतवाडा पोलिसांनी २५ जून रोजी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------------

चांदूर बाजारात महिलेची पर्स चोरली

चांदूर बाजार : रेडिमेड कापडाच्या दुकानात गेलेल्या रीता विजय सोळंके (३५, रा. वडनेर गंगाई, ता. दर्यापूर) यांची पर्स अज्ञात महिलेने चोरली. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख एक हजार असा १३ हजारांचा ऐवज होता. २५ जून रोजी ही घटना घडली. चांदूर बाजार पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------------

सेंट्रिंग टाकून अडविला रहदारीचा मार्ग

अचलपूर : नामदारगंज बेगमपुरा येथील ४६ वर्षीय महिलेला जीवनसिंह विजयसिंह चौहान, महावीरसिंह विजयसिंह चौहान यांनी शिवीगाळ केली तसेच बीट घेऊन अंगावर मारण्यास धावले. महिलेच्या घरापुढील ये-जा करण्याच्या मार्गावर आरोपींनी स्लॅबसाठी सेंट्रिंग बांधल्याने मार्ग अवरुद्ध झाला. त्याबद्दल विचारणा केल्यानंतर हा प्रकार घडला. २५ जून रोजी अचलपूर पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------

जांबू शिवारात शेतकऱ्याला मारहाण

धारणी : तालुक्यातील जांबू शिवारातील शेतात वखार वाहत असलेला बालाराम तोताराम बेठेकर (२६) याला त्याचे मोठे वडील मोतीलाल बाटू भिलावेकर (बेठेकर) याने डोक्यावर कुऱ्हाडीच्या दांड्याने मारून जखमी केले. अजय मोतीलाल भिलावेकर (बेठेकर) त्याने शिवीगाळ केली. याप्रकरणी धारणी पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.