शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:09 IST

मोर्शी : तालुक्यातील कोळविहीर येथे दुचाकीला झालेल्या अपघातात पती, पत्नी व मुलगा असे तिघे जखमी झाले. १७ जून रोजी ...

मोर्शी : तालुक्यातील कोळविहीर येथे दुचाकीला झालेल्या अपघातात पती, पत्नी व मुलगा असे तिघे जखमी झाले. १७ जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून दुचाकीवरील यश तायडे व मयूर बावनकर (दोन्ही रा. शिराळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

अल्पवयीन मुलीला पळविले

मोर्शी : तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. १७ जून रोजी सकाळी ही घटना उघड झाली. शिरखेड पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मंगेश संजय पांढरे व अक्षय तुकाराम धानोकार (२५, रा. चिखलसावंगी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------

कोळविहीर येथून दुचाकी लंपास

शिरखेड : मोर्शी तालुक्यातील कोळविहीर येथील अहिल्याबाई शाळेजवळून एमएच २७ बी ६३८३ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. १५ जून रोजी हा प्रकार घडला. शिरखेड पोलिसांनी सुधाकर कोल्हे (६०, रा. कोळविहीर) यांच्या तक्रारीवरून १८ जून रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------------

महावितरणच्या वसाहतीत महिलेला मारहाण

मोर्शी : महावितरणच्या कर्मचारी वसाहतीत ६२ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली तसेच तिच्या मुलालादेखील शिवीगाळ करण्यात आली. मोर्शी पोलिसांनी तेथीलच दादाराव अडकने (५०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

पेठ मंगरूळी शिवारातील पोल काढले

बेनोडा : लगतच्या शिवारात अनधिकृत प्रवेश करून शेतीला लावलेले सिमेंट पोल काढून टाकण्यात आले. यात सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार कुंडलिक मस्के (६४, रा. मोर्शी) यांनी नोंदविली. १६ जून रोजी ही घटना उघड झाली. याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी जलालखेडा येथील एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------

खुर्चनपूर येथे महिलेसह मुलाला मारहाण

दर्यापूर : तालुक्यातील खुर्चनपूर येथील एका ६० वर्षीय महिलेच्या हातावर चाकू मारण्यात आला तथा मुलालादेखील लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. १७ जून रोजी हा प्रकार घडला. दर्यापूर पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर चापके (४०, येवदा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

येवद्याच्या जिल्हा परिषद शाळेत चोरी

येवदा : येथील जिल्हा परिषद कन्या शाळेतील ७०० रुपये किमतीचा गंज चोरीला गेला. १८ जून रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास हा प्रकार उघड झाला. मुख्याध्यापक संदीप बेराड (४९) यांच्या तक्रारीवरून आरोपी अजय विजय मोहोड (२७, येवदा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-----------------

चांदूर बाजार येथून दुचाकी लंपास

चांदूर बाजार : येथील एका बँक परिसरातून दुचाकी लंपास करण्यात आली. ९ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी दुचाकीचालक योगेश नवले (२८, रा. कोंडवर्धा) यांच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

चांदूर बाजार येथे तरुणाला मारहाण

चांदूर बाजार : येथील मैनाबाई शाळेजवळ राहणाऱ्या दीपक सुदाम धावडे (१८) याला काठीने मारहाण करण्यात आली. १८ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. चांदूर बाजार पोलिसांनी याप्रकरणी अजय वासनकर (२५, रा. मैनाबाई शाळेजवळ, चांदूर बाजार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

धामणगाव रेल्वे येथील मुलीची फसवणूक

धामणगाव रेल्वे : येथील एका १७ वर्षीय मुलीची ४ हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. १८ जून रोजी सकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी ८३४६८४६७२८ क्रमांकाच्या जळगाव खानदेश येथील मोबाईल वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------------

वऱ्हा येथे १.८७ लाखांची चोरी

तिवसा: तालुक्यातील वऱ्हा येथील ज्ञानेश्वर शेंडे (३२) यांच्या घरातून १.५० लाख रुपये व साबीर खान कदीर खान पठाण यांच्या घरातून २७ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. १७ जून रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शेंडे यांच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

दहिगाव येथे महिलेला मारहाण

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील दहिगाव रेचा येथील एका ५५ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. जागेच्या वादातून १८ जून रोजी ही घटना घडली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी याप्रकरणी एका ५८ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

------------