शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सारांश, निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST

फोटो सायकल पी ३१ जागृत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकली वाटप वरूड : जागृत कनिष्ठ महाविद्यालयातील गरीब आणि होतकरू मुला-मुलींना ...

फोटो सायकल पी ३१

जागृत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकली वाटप

वरूड : जागृत कनिष्ठ महाविद्यालयातील गरीब आणि होतकरू मुला-मुलींना संस्थेच्यावतीने नुकतेच सायकली वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाला मीना बंदे, प्राचार्य संध्या वांदे, उपप्राचार्य मंदा चौधरी, पर्यवेक्षक चंद्रशेखर अढाऊ उपस्थित होते. राजेंद्र राजोरीया, प्रवीण चौधरी, प्रफुल्ल होले, समता चौधरी, पंकज बिजवे, महेंद्र राऊत, रुपेश महाजन या डॉक्टर मंडळींनी सहकार्य केले.

--------------

जुन्या शहरात पालखी सोहळा

अमरावती : श्रीराम जय राम जय जय राम’ या रामभक्तांनी पालखी सोहळ्यात गायिलेल्या जोशपूर्ण गीताने ऐतिहासिक परकोटाच्या आतील जुने अमरावती शहर दुमदुमून गेले. श्रीराम जन्मभूमी मंदिर (अयोध्या) निर्माण हेतू गृह संपर्क व निधी समर्पण महाभियान समिती सोमेश्वरनगराच्यावतीने नगरातून प्रभू श्रीराम यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन स्थानिक अंबागेटच्या आतील लक्ष्मीकांत मंडळ स्थित विठ्ठ्ल मंदिर येथून करण्यात आले होते.

------------------------------

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित

अमरावती : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ प्रतंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक प्राधान्याने करावी, यासाठी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांच्या नेतृत्वात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांची शनिवारी (कोल्हापूर) येथे भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी वर्षा केनवडे, राजेंद्र पाटील, राजेश सोनपराते, ओमाजी कांबळे, अर्जुन पाटील उपस्थित होते.

-------------------------------

विभागीय आयुक्त कार्यालयात हुतात्म्यांना आदरांजली

अमरावती : देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मे झालेल्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी ३० जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसिलदार वैशाली पाथरे, नाझर पेठे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

--------------

गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वितरण

मोर्शी : निवृत्त वनाधिकारी अशोक कविटकर यांनी दरमहिन्याला शालेय वस्तुंच्या मोफत वितरणाचा संकल्प सोडला आहे. त्याअनुषंगाने येथील स्व.अण्णासाहेब कानफाडे स्मृती शिवाजी विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती प्रदीप कु-हाड होते. संचालन संदीप टिक्कस, प्रास्तविक मिलिंद ढाकुलकर तर आभार अश्विन पवार यांनी मानले.

---------------

रक्तदान शिबिर, एड्स जनजागृती कार्यक्रम

मोर्शी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोर्शी येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमाला आयटीआयचे प्राचार्य एन. आर कथिले, प्रकाश गंडोधर, अविनाश उकंडे, उमेश आगरकर, स्वाती बुरंगे, संंगीता गायधने, प्रवीण कळसकर, सुवर्णा श्रीराव व समुपदेशक श्रीकांत गोहाड यांचे सहकार्य लाभले.

-----------

फोटो पी ३१ शफीक अहमद

निधन

शफिक अहमद

धामणगाव रेल्वे : येथील शफीक अहमद (६०) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी, चार भाऊ, चार बहिणी व मोठा आप्त परिवार आहे. येथील जि.प. शिक्षक शकील अहमद यांचे ते मोठे बंधू होत.

-------------

कृषी विभागाचे काम बंद आंदोलन

येवदा : विभागीय कृषि सहसंचालकातील कार्यालयातील कर्मचारी भोयर यांना मारहाण करण्यात आली. त्या निषेधार्थ कृषि सहायक संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले आहे. १ फेब्रुवारी रोजी आयुक्त व जिल्हाधिकाºयांना त्याबाबत निवेदन दिले जाणार आहे.

-------------

फोटो जालिम पाटील यांचेकडे

निधन

बापुराव काकडे

कु-हा : ज्येष्ठ नागरिक बापुराव नीळकंठ काकडे (८७, माणिकग्राम धोत्रा) यांचे २९ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, स्रुषा, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. पत्रकार अशोक पवार यांचे ते मामा होत.

-----------