शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रारीसाठी सरसावली सुकाणू समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:42 IST

शेतकºयांच्या मागण्यांबाबत मान्य न करता त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत २० आॅक्टोबर रोजी नांदगाव खंडेश्वर, तिवसा, ...

ठळक मुद्देशेतकरी आत्महत्या : तिवसा, नांदगाव, कुºहा ठाण्यात निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शेतकºयांच्या मागण्यांबाबत मान्य न करता त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत २० आॅक्टोबर रोजी नांदगाव खंडेश्वर, तिवसा, कुºहा व इतर पोलीस ठाण्यांमध्ये सुकाणू समितीने निवेदन दिले.शेतकºयांचा सातबारा कोरा करू, स्वामिनाथन आयोग लागू करू हे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते; मात्र अद्यापही हे आश्वासन त्यांनी पूर्ण केले नसल्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात १८ शेतकरी फवारणीदरम्यान मृत्युमुखी पडले. या घटनांना मुख्यमंत्री जबाबदार असून, त्यांच्याविरोधात फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून घ्यावा, यासाठी तिवसा पोलीस ठाण्यात सुकाणू समितीने तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्यासोबत चंद्रकांत वडस्कर, प्रकाश सोनोने, महादेव गारपवार, शफीक शाह आदी आंदोलकांनी चर्चा केली.नांदगाव खंडेश्वर येथे ठाणेदारांना निवेदननांदगाव खंडेश्वर : स्थानिक पोलिस ठाण्यातही मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करण्याबाबत ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी अ.भा. किसान सभेचे जिल्हा सचिव श्याम शिंदे, तुकाराम भस्मे, पंडितराव ढोके, नारायण भगवे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रभाकर शिंदे, योगेश अवझाडे, दिलीप महल्ले, अमोल धवसे, इद्रिसभाई, हरिदास देशमुख, रामदास मते, अनिल मारोटकर, सतीश शिंदे, प्रफुल्ल देशमुख, विनोद वैद्य आदी उपस्थित होते.कुºह्यात किसान सभेची तक्रारकुºहा : पोलिस ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भादंविचे कलम ३०४, ३०६, ४२० अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी बलिप्रतिपदेच्या दिवशी किसान सभेचे शिष्टमंडळ पोहोचले. याप्रकरणी कोठे तरी एका ठिकाणी गुन्हे दाखल होणार, तुमची तक्रार वरिष्ठांना पाठवू, असे ठाणेदारांनी सांगितले. याप्रसंगी किसान सभेचे राज्य सचिव अशोक सोनारकर, दिलीप नाहाट, विजयसिंह नाहाटे, यादवराव पाखरे, सै. जहांगीर, संतोष भैसे, राजाभाऊ बाभूळकार, कुंजनसिंह बंगरे, ज्ञानेश्वर मानमोडे, सचिन सखी, उमेश मेसरे, प्रशांत लिलर्वे, जाफरमियाँ उपस्थित होते.