शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकअपमध्ये आत्महत्या; सीआयडीने सांभाळला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST

अतिसुरक्षित पोलीस कोठडीत आरोपीने गळफास कसा घेतला, यावर शंका व्यक्त केल्या जात आहेत. सागर ठाकरे याला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने त्याला फ्रेजरपुरा ठाण्यातील उपनिरीक्षक भारती मामनकर यांनी बुधवारी सायंकाळी राजापेठ पोलीस ठाण्यात आणले. त्याने तेथेच गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस लॉकअपमध्ये सीसीटीव्हीसह पोलीस गार्ड तैनात असताना घडलेल्या आत्महत्येने पोलीस ठाण्यातील ‘निग्लेजंसी ऑफ वर्क’ चव्हाट्यावर आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यातील अतिसुरक्षित लॉकअपमध्ये झालेल्या सागर ठाकरे (२४) या आरोपीच्या पहाटेच्या आत्महत्येवर त्याच्या कुटुंबीयांनी रोष व्यक्त केला असून, संबंधितांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली आहे. यासंबंधी राजापेठ  ठाण्यातील पोलीस ­गार्ड प्रशांत इंगोले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले, तर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी चालविली आहे. घटनेनंतर लगेचच राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी क्राईम) ने मोर्चा सांभाळून स्थानिक पोलीस प्रशासनाच्या  ‘हार्टबिट’ वाढविल्या.गुरुवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघड झाल्यानंतर दुपारी ४.३० पर्यंत राजापेठ ठाण्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दुपारी ४.३० च्या सुमारास सागरचा मृतदेह अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अतिसुरक्षित पोलीस कोठडीत आरोपीने गळफास कसा घेतला, यावर शंका व्यक्त केल्या जात आहेत. सागर ठाकरे याला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने त्याला फ्रेजरपुरा ठाण्यातील उपनिरीक्षक भारती मामनकर यांनी बुधवारी सायंकाळी राजापेठ पोलीस ठाण्यात आणले. त्याने तेथेच गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस लॉकअपमध्ये सीसीटीव्हीसह पोलीस गार्ड तैनात असताना घडलेल्या आत्महत्येने पोलीस ठाण्यातील ‘निग्लेजंसी ऑफ वर्क’ चव्हाट्यावर आले आहे. 

मृतदेह हलवू देणार नाही; बहिणीचा आक्रोश दुपारी १२ च्या सुमारास त्याची बहीण, जावई व भाऊ राजापेठ ठाण्यात पोहोचले. बहिणीचा आक्रोश हृदय पिळवटणारा होता. संबंधित पोलिसांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

जावयाने नोंदविली तक्रारसागर ठाकरे आत्महत्याप्रकरणाचा निष्पक्ष तपास करावा. सागरच्या कुटुंबातील एकाला पोलीस सेवेत घ्यावे. शवविच्छेदन ‘इन कॅमेरा’ व्हावे. जे पोलीस अधिकारी दोषी असतील, त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी तक्रार सागर ठाकरेचे जावई मनोज निकाळजे (रा. नागपूर) यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.

त्याने मृतदेहासोबत काढले आठ तास राजापेठच्या लॉकअपमध्ये सागर ठाकरे याच्याव्यतिरिक्त बडनेरा पोलीस ठाण्यातील एक आरोपी होता. तो दुसरा आरोपी दुपारी ३ पर्यंत त्याच लॉकअपमध्ये सागरच्या मृतदेहाजवळ होता. डीसीपींच्या आदेशानुसार, दुपारी काही काळासाठी त्याला लॉकअपबाहेर काढण्यात आले तेव्हा तो भयभीत झाला होता. बडनेरानजीक वडगाव जिरे येथील रहिवासी असलेल्या त्या आरोपीला चोरीच्या प्रकरणामध्ये बडनेरा पोलिसांनी अटक केली होती. सागर ठाकरेची आत्महत्या झाली त्यावेळी आपण निद्राधीन होतो, असे बयान त्याने न्यायाधीश, सीआयडी व उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिले.

 

टॅग्स :Policeपोलिस