शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘सुसाईड इन कस्टडी’ने वाढविले पोलिसांचे ‘हार्टबिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 05:00 IST

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा  पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास सागर श्रीपत ठाकरे याला अटक केली. १८ रोजी त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर करून २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली. १८ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्याला राजापेठच्या लॉकअपमध्ये टाकण्यात आले होते. 

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यातील ‘सुसाईड ईन कस्टडी’ने  पोलीस यंत्रणेचे हार्टबिट वाढविले आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून एकीकडे तपास सुरू असताना, राजापेठच्या सहायक पोलीस आयुक्तांनी देखील समांतर चौकशी आरंभली आहे. शुक्रवारी राजापेठ पोलीस ठाण्यात ‘रूटिन वर्क’ सुरू असले, तरी आरोपीच्या कोठडीतील आत्महत्येचा धसका अनेकांच्या चेहऱ्यावर ठळकपणे जाणवला. या घटनेचा तपास ‘सुमोटो’ सीआयडीकडे गेला असताना, संभाव्य कारवाईची तलवार नेमकी कुणावर कोसळणार, अशी साशंक भीती अनेकांना सतावत आहे.अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याच्या आरोपाखाली फ्रेजरपुरा  पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास सागर श्रीपत ठाकरे याला अटक केली. १८ रोजी त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर करून २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली. १८ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्याला राजापेठच्या लॉकअपमध्ये टाकण्यात आले होते. ‘ते’ चौकशीच्या फेऱ्यातघटनेवेळी ड्युटी ऑफीसर म्हणून पीएसआय, दोन  रायटर, तपास मदतगार, संगणकावर  व स्टेशन डायरीवर दोन महिला पोलीस कर्तव्यावर होत्या. हवालातसमोर चार अधिक एक गार्ड अशी ड्युटी होती. असे असताना सागरने सकाळी ७ च्या सुमारास आत्महत्या केल्याने हाकेच्या अंतरावर असलेली ही सारी मंडळी नेमकी काय करीत होती, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे तेदेखील कारवाईच्या कक्षेत येण्यार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे हवालातीच्या भिंतीला लागूनच पोलीस कर्मचारी हजर असतात.

हवालातीच्या दाराच्या आर्कला बांधले शर्ट?पोलीस सूत्रानुसार, राजापेठ पोलीस ठाण्यातील हवालातीला एकमेव लोखंडी दार आहे. ते सुमारे १० ते १२ फुट उंचीचे असावे. दाराच्या अगदी वरच्या भागाला आरोपीने शर्ट बांधला. त्या शर्टची बाहीने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी गुरूवारीच उघड केली होती. त्यावेळी हवालातीत अन्य एक आरोपी होता, तो त्यावेळी निद्राधीन होता. तसा जबाब त्याने दिला आहे. 

ठाणेदारांचे कॅबिनमध्ये सीसीटीव्ही स्क्रिनराजापेठ पोलीस ठाण्यात एकूण १६ सिसीटिव्ही कॅमेरा आहेत. ते ठाणेदारांच्या कक्षातील स्क्रिनला जोडण्यात आले. पैकी १४ कॅमेरे सुरू आहेत. हवालातमध्ये असलेल्या एका सिसिटिव्हीचा देखील त्यात समावेश आहे. पोलीस ठाणे, हवालातीपासून ठाण्यात कोणते वाहन, कोणता इसम प्रवेशला, हे ठाणेदार आपल्या कक्षातील स्क्रिनवर पाहू शकतात. 

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?सागर ठाकरेविरूद्ध गुन्हे नोंदविले ते फ्रेजरपुरा पोलिसांनी, अटकही त्यांच्याच दप्तरी. लॉकअप नसल्याने त्याला राजापेठ लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. त्या लॉकअपमध्ये सागरने स्वत:ला संपविले. राजापेठ पोलिसांची प्रचंड धावाधाव झाली. राजापेठमधील डीओपासून, डायरी अंमलदार, गार्ड  व ठाणेदारांना देखील सीआयडी चौकशी, बयानाला सामोरे जावे लागणार आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस