शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वित्त विभागातील पीएफएमएस प्रणाली अचानक बंद

By जितेंद्र दखने | Updated: October 16, 2024 12:31 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती : प्रशासकीय कामकाज ठप्प

जितेंद्र दखनेअमरावती : राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने केंद्र-राज्य शासनाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदस्तरावरील निधीचे वितरण व संनियंत्रण करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये एकसूत्रता राहावी, यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयीकृत बँकेने विकसित केलेल्या जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टीम या प्रणालीचा वापर करण्यास शासन मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने फंड मॉनिटरिंग सिस्टीम प्रणालीचा वापर सन २०२०-२१ मध्ये सुरू करण्यात आलेली होती. मात्र, १५ ऑक्टोबर रोजी अचानकच ही प्रणाली वरिष्ठ पातळीवरून बंद करण्यात आली आहे. परिणामी, जिल्हा परिषदेतील वित्त विभागाचे सर्व आर्थिक व प्रशासकीय कामकाज ठप्प पडले आहे. परिणामी, सिस्टीमच बंद पडल्याने वित्त विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताटकळत बसून राहावे लागले.

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या वित्त विभागामार्फत शासनाकडून तसेच जिल्हा नियोजन समितीकडून विविध योजना, विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार सदरच्या निधीचे वित्त विभागामार्फत बांधकाम, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा व स्वच्छता, पंचायत विभाग, सामान्य प्रशासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी, पंचायत समिती आदी विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, विकासकामे तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन व अन्य लाभ आदी प्रकारचे आर्थिक व्यवहाराचे कामकाज केले जाते. मात्र, मंगळवार, १५ ऑक्टोबर रोजी अचानक जिल्हा परिषदेतील फंड मॉनिटरिंग सिस्टीम प्रणालीसाठी उपलब्ध करून दिलेल्या तांत्रिक व इतर अनुषंगिक सुविधा बंद करण्यात येत असल्याचा मेसेज या सिस्टीम धडकला. यामुळे वित्त विभागातील प्रशासकीय कामकाज ठप्प पडले. परिणामी, वित्त विभागातील आर्थिक व्यवहारही कोलमडले आहेत.

"जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात फंड मॉनिटरिंग सिस्टीम प्रणालीद्वारे आर्थिक व्यवहाराचे कामकाज केले जात होते. परंतु १५ ऑक्टोबर राेजी ही प्रणालीमधील सुविधा बंद करण्यात आल्याचा मेसेज आला. परिणामी, कामकाज विस्कळीत झाले. दरम्यान, याबाबत शासनाकडून पुढील पर्यायी व्यवस्थेबाबत सूचना अप्राप्त आहेत. त्यामुळे शासनाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल."-अश्विनी मारणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी

टॅग्स :Amravatiअमरावतीzpजिल्हा परिषद