लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सहायक पोलीस निरीक्षक शांतीलाल पटेल यांच्या हत्येनंतर समाजमन ढवळून निघाले. कर्तव्यावर असताना माणुसकी जपणारा एक पोलीस कर्मचारी अचलपूर उपजिल्हा रूग्णालयात मृतांच्या नातेवाईकांना आधार देणारा, अपघातग्रस्तांसह गोरगरिबांना मदत करणारा, प्रसंगी अनाथांच्या ‘कफण’करिता हात पुढे करणारा, कर्मचाऱ्यांसमवेत राबणारा शांतीलाल.शांतीलालच्या हत्येमुळे उपजिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या भावना, दु:ख शब्दापलिकडचे ठरले. या कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने शांतीलालच्या फोटोसह श्रद्धांजलीचा एक फलक परतवाडा शहरातील जयस्तंभ चौकात लावला. खरे तर एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण करण्याचा, श्रद्धांजलीपर फलक लावण्याचा जुळ्या नगरीतील हा पहिलाच प्रसंग असून तो लक्षवेधक ठरला आहे. येथे युवा स्वाभिमानची दहीहंडी प्रथमच पार पडली. याकरिता सिनेस्टार गोविंदा शहरात दाखल झाला. बाजार समिती अचलपूरमधील टीएमसी परिसरातील व्यासपीठावर गोविंदा, नवनीत राणा आणि रवी राणा यांचे आगमन होताच नवनीत राणा यांनी माईक हाती घेतला. उपस्थितांचे गोविंदाकडे लक्ष खेचत आपल्यात कोण आले... कोण आले असा प्रश्न उपस्थित जनसमुदायापुढे त्यांनी मांडला. जनसमुदायाकडून ‘गोविंदा’ असे उत्तर मिळताच, नवनीत राणा यांनी दुसरा प्रश्न उपस्थित केला, ‘गोविंदा खरा की खोटा’, उत्तर खरा, असे मिळताच माझे रवि राणा ओरीजनल आहेत. त्यांनी आपल्यापुढे ओरीजनल ‘गोविंदा’जींनाच उभे केले आहे.
शांतीलाल यांना अशीही श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 22:14 IST
सहायक पोलीस निरीक्षक शांतीलाल पटेल यांच्या हत्येनंतर समाजमन ढवळून निघाले. कर्तव्यावर असताना माणुसकी जपणारा एक पोलीस कर्मचारी अचलपूर उपजिल्हा रूग्णालयात मृतांच्या नातेवाईकांना आधार देणारा, अपघातग्रस्तांसह गोरगरिबांना मदत करणारा, प्रसंगी अनाथांच्या ‘कफण’करिता हात पुढे करणारा, कर्मचाऱ्यांसमवेत राबणारा शांतीलाल.
शांतीलाल यांना अशीही श्रद्धांजली
ठळक मुद्देपोलीस प्रशासन ‘हाय हाय’, : ‘गोविंदा’ खरा की खोटा? जुळ्या नगरीत पहिल्यांदाच