अमरावती : कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंचच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्त्व व त्यांच्या राशी मधील गमती-जमती यावर आधारित सुप्रसिद्ध ज्योतिष्याचार्य अरविंद पांडे आणि सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक संजय पेंडसे यांचे राशींवर आधारित मार्गदर्शन पर प्रस्तुतीवर सखी मंच सदस्य तसेच कार्यक्रमात रंगत आणली. १६ जून रोजी अभियंता हॉल शेगाव नाका चौक, व्हीएमव्ही रोड, अमरावती येथे राशी कवच कार्यक्रम घेण्यात आला.भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याभोवती आपले आयुष्य फिरत असते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तीनही काळाचा विचार करून प्रत्येक पाऊल टाकत असतो. काल केलेल्या चुका आज करायच्या नाही आणि पुढे पण करायच्या नाही, असे ठरविणारी प्रत्येक व्यक्ती तीनही काळाचा विचार करीत असते. पण हा विचार करीत असताना नेमका राशींचा प्रभाव त्याच्या जीवनावर कसा आणि केव्हा होतो. मनुष्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी, त्यांचा व्यवसाय, प्रगती, नोकरी यश या सर्व गोष्टींवर त्यांच्या कर्तृत्वाबरोबर त्याच्या नशिबाचा आणि राशीचा प्रभाव पडतो, हेच नेमके कार्यक्रमातून सांगण्यात आले. याप्रसंगी सखी मंच सदस्य आणि परिवारासहीत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.कलर्स प्रस्तुत राशी चक्र कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध ज्योतिष्याचार्य अरविंद पांडे, दिग्दर्शक संजय पेंडसे, मिनी महापौर अर्चना इंगोले, नलिनी थोरात, 'लोकमत'चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे यांचे हस्ते द्विपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर सुप्रसिद्ध ज्योतिष्य प्रकाशचंद्र वाघ यांनी पंडितांची सुरेख भूमिका निभावली. तसेच नयन बोकडे यांनी ‘मंजुलिका’ची भूमिका सादर करून नाव्या रुपांतराचे सुरेख सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळविली. तसेच अवघ्या १० मिनिटांमध्ये राशी कवचमधील देखावा सादर करून कधी चालू होणार याची असंख्य रसिक आतुरतेने वाट पाहात होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सखीमंच संयोजिका स्वाती बडगुजर, भारती कळसकर यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)
कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंचतर्फे राशी कवचचे यशस्वी आयोजन
By admin | Updated: June 20, 2016 00:04 IST