शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

तांत्रिक चुकीत अडकल्या विषय समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:22 IST

पहिली प्रक्रिया रद्द : दुसरीवर ‘स्टे’, पाचऐवजी सहा सदस्यांची निवड; सत्ताधाऱ्यांचा आक्षेप चांदूरबाजार : स्थानिक नगरपालिकेच्या विषय समित्यांची ...

पहिली प्रक्रिया रद्द : दुसरीवर ‘स्टे’, पाचऐवजी सहा सदस्यांची निवड; सत्ताधाऱ्यांचा आक्षेप

चांदूरबाजार : स्थानिक नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवड २९ जानेवारी रोजी होणार होती. त्यासाठी २२ जानेवारी रोजी पालिका सदस्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते; परंतु पीठासीन अधिकाऱ्यांच्या तांत्रिक चुकीमुळे विषय समित्यांची निवड रद्द करण्यात आल्याने निवडप्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

विषय समिती सदस्य निवडीची प्रक्रिया राबविताना पीठासीन अधिकाऱ्यांकडून तांत्रिक चूक झाली. पाणीपुरवठा समिती वगळता शिक्षण, महिला व बाल कल्याण, तसेच बांधकाम समितीमध्ये प्रत्येकी पाच सदस्यांची निवड करणे आवश्यक होते. परंतु या विषय समित्यांवर पाचऐवजी प्रत्येकी सहा सदस्य घेण्यात आले. पक्षीय संख्याबळानुसार या समित्यांवर पालिकेतील सत्ताधारी गटाचे तीन व विरोधी गटाचे दोन सदस्य घेणे आवश्यक होते. मात्र पीठासीन अधिकाऱ्यांना याबाबत योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ही चूक घडली. यावर सत्ताधीशांनी आक्षेप नोंदविला आहे. याप्रकरणी पीठासीन अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितले. त्यांनी पहिली निवडप्रक्रिया रद्द करून, पुन्हा सर्व विषय समित्यांची निवडप्रक्रिया १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र यावर सत्ताधाऱ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी विभागीय आयुक्तांकडून दुसऱ्या निवड प्रक्रियेवर स्थगनादेश आणला आहे. याबाबत विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात २ फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे.

काय आहे तक्रारीत?

विभागीय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी म्हटले आहे की या प्रकरणात पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार यांची चूक आहे. त्यामुळे सर्व समित्यांमधून विरोधकांनी दिलेली नावे वगळण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर मंगळवार, २ फेब्रुवारी होणाऱ्या सुनावणीत आयुक्त काय निर्णय घेता, याकडे पालिका प्रशासनासह सत्ताधारी, विरोधकांचे लक्ष लागले आहे.

कोट

विषय समित्यांवर पाचऐवजी सहा सदस्य घेतल्याची चूक पीठासीन अधिकाऱ्यांकडून घडली आहे. याबाबत आम्ही विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली आहे. २ फेब्रुवारी रोजी त्यावर सुनावणी आहे.

नितीन कोरडे, नगराध्यक्ष, चांदूरबाजार

----------------