तहसील कार्यालयात मुद्रांक विक्रेत्यांना ताकीद दिली.
तहसील कार्यालयात विविध कामाकरिता मुद्रांक खरेदी करण्यास येणाऱ्या गोरगरिबांच्या मजबुरीचा फायदा घेत मुद्रांक विक्रेते किमतीपेक्षा आगाऊ रक्कम उकळत असल्याचे प्रतिनिधीने फेरफटका मारला असता, निदर्शनास आले. हा मुद्दा लोकमतने लोकदरबारात मांडताच याची दखल घेण्यात आली. अमरावती तहसील कार्यालयांतर्गत १४ मुद्रांक विक्रेते आहेत. मात्र, कोरोनाचा संसर्गवाढीला वाव मिळू नये, यासाठी त्यापैकी काहींना घरूनच मुद्रांक विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.
बॉक्स
शेतकऱ्यांची लूट थांबणार
सद्यस्थितीत पेरणीची लगबग सुरू असल्याने शेतकरी बी-बियाणे, खत, तणनाशक खरेदीसाठी पैशाची जुळवाजुळव करण्यात व्यस्त झाला आहे. बहुतांश शेतकरी बँककडून पीककर्ज घेतात. त्यासाठी त्यांना मुद्रांकावर अफिडेव्हीट करून द्यावे लागतात. त्यासाठी तहसीलमध्ये सध्या शेतकऱ्यांची गर्दी वाढली असताना मुद्रांकाची आगाऊ किमतीने विक्री सुरू होती. मात्र, लोकमतच्या वृत्ताने आता किमतीनुसारच मुद्रांक विक्रीची ताकीद दिल्यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबण्यास मदत झाली आहे.
कोट
तहसील कार्यालयांतर्गत १४ मुद्रांक विकेत्यांना दालनात बोलावून किमतीनुसारच मुद्रांक विक्री करावी, अशी ताकीद दिली आहे.
- मनीष पलिकोंडवार, प्रभारी सब रजिस्ट्रार, अमरावती