शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

विद्यार्थ्यांची शाळांना ‘फिफ्टी- फिफ्टी’ पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST

अमरावती : गेल्या १० महिन्यांनंतर बंद असलेले पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले. मात्र, कोरोना लस आल्यानंतरही पालकांच्या ...

अमरावती : गेल्या १० महिन्यांनंतर बंद असलेले पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले. मात्र, कोरोना लस आल्यानंतरही पालकांच्या मनात दहशत कायम आहे. किंबहुना शहरी भागातील विद्यार्थी ऑनलाईन, तर ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑफलाईन शिक्षणास प्राधान्य देत आहे. त्यामुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक पालकांनी शाळांना संमतीपत्र लिहून दिलेले नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे १ लाख ५७ हजार ०२२ विद्यार्थी संख्या असताना केवळ --- एवढेच विद्यार्थी पहिला दिवशी शाळेत उपस्थित होते. शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यासाठी सुक्ष्म नियाेजन चालविेले होते. तब्बल ९ हजार २१८ शिक्षकांची २३ ते २५ जानेवारी यादरम्यान कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ------ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार २७ जानेवारीपासून जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषद, नगरपंचायती, खासगी संस्थाच्या अनुदानित शाळा अशा पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे शिक्षण विभागाने नियोजन चालविले. पालकांकडून मुलांना शाळांमध्ये पाठविण्यासाठी संमतीपत्र भरून घेण्यात आले. शहरातील शाळांमध्ये अल्प प्रतिसाद दिसून आला, मात्र, ग्रामीण भागात शाळांमध्ये विद्यार्थी संख्या बऱ्यापैकी होती, अशी आकडेवारीवरुन दिसून येते. शहरी भागातील काही शाळांमध्ये दहावी पूर्व तयारी परीक्षा, डी.एडची परीक्षा होत असल्याने फेब्रुवारीपासून नियमित शाळा सुरु होतील, असे ज्ञानमाता हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर जोसलिन यांनी सांगितले.

-----------------

विद्यार्थी उपस्थितीच्या नोंदीसाठी लिंक

पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दैंनदिन उपस्थितीच्या नोंदीसाठी शासनाने ऑनलाईन नोंदी करण्याचे निर्देश दिले आहे. त्याकरिता स्वतंत्र लिंकची सुविधा देण्यात आली आहे. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत विद्यार्थी उपस्थितीची माहिती ऑनलाईन पाठविली जाणार आहे.पाचवी ते आठवीचे जिल्ह्यात १ लाख ५७ हजार २२ विद्यार्थी असून, ९ हजार २१८ शिक्षक आहेत.

-----------------

कोरोना नियमावली्ंचे पालन

विद्थार्थी शाळेत येताच त्यांची प्रवेशद्धारावर थर्मल गनद्धारे तापमान तपासण्यात आले. एका वर्गात दोन विद्यार्थ्यांचे सहा फुटाचे अंतर असेल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. सॅनिटाईजची सोय असल्याचे बहुतांश शाळांमध्ये दिसून आले. गर्दी होणार नाही, यासाठी प्रवेशद्धारावरच शिक्षक कर्तव्य बजावत होते. तोंडाला मास्कशिवाय प्रवेश देण्यात आला नाही. विद्यार्थांना सर्दी, खोकला, ताप असल्यास प्रवेश नव्हता. बुधवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलांना पालक सोबत घेऊन आले होते.

----------------------

महानगरातील २४० शाळांमध्ये ३० टक्के उपस्थिती

महापालिका हद्दितील पाचवी ते आठवीच्या खासगी, महापालिकेच्या एकूण २४० शाळा असून, एकंदरीत ४४ हजार ५४४ विद्यार्थी संख्या आहे. बुधवारी २१० शाळा सुरू झाल्या असून, यात १३ हजार ३२० विद्यार्थी उपस्थित होते. ही उपस्थितीची टक्केवारी ३० टक्के एवढी नोंदविण्यात आली आहे. पाचवी ते आठवीचे शिक्षक १५७६ असून, २४० शिक्षकेत्तर कर्मचारी आहे. आतापर्यंत ६५० शिक्षकांची कोराना चाचणी झाली आहे. त्यापैकी २० शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहे. पहिल्या दिवशी ३० शाळा उघडल्या नाही.

----------------

कोरोना काळात विद्यार्थी घरीच होते. मात्र, बुधवारी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना ‘कोरोना बालवीर’ पदक देऊन सन्मानित करण्यात आले. महापालिका शाळांमध्ये हा उपक्रम राबविला गेला. विद्यार्थ्यांचे हार, फुले देऊन स्वागत केले.

- योगेश पखाले, शिक्षक, वडाळी महापालिका शाळा क्रमांक १४

---------------------

गत दहा महिन्यांपासून घरी असल्याने आता शाळेत कंटाळवाणे जाणवत आहे. मात्र, शाळांशिवाय अभ्यास पूर्ण होणे नाही. शिक्षकांशी थेट संवादानंतर प्रश्नांची उकल होते. आता हळूहळू वर्ग सुरु होतील आणि विद्यार्थी देखील उपस्थित राहतील, यात दुमत नाही.

- आर्यन मोलके, वर्ग सातवा, ज्ञानमाता हायस्कुल, अमरावती.

-------------------------