लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक कठोरा मार्गालगतच्या गजानन टाऊनशिप परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहातील समस्या, मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याप्रकरणी येथील अपर आयुक्त (एटीसी) कार्यालयावर सोमवारी विद्यार्थ्यांनी धडक देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी गृहपाल प्रमुख गिरीश पोळ, गृहपाल आजनकर यांचे निलंबन करण्याची मागणी एटीसीकडे केली.युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटना, अखिल भारतीय गोंडवाना पार्टी यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहातील गैरसोयींबाबत एटीसी गिरीश सरोदे यांच्या पुढ्यात समस्या मांडल्यात. आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याप्रकरणी ११ आॅक्टोबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले होते. यावेळी संबंधित अधिकाºयांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न त्वरेने निकाली काढले जातील, असा विश्वास दिला होता. मात्र, प्रश्न, समस्या ‘जैसे थे’ असल्याने सोमवारी विद्यार्थी एटीसीवर धडकले व गृहपाल आजनकर, गृहपाल प्रमुख गिरीश पोळ यांच्या कारनाम्याची यादी अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. आदिवासी विद्यार्थ्यांना बेचव जेवण दिले जात असताना याकडे दुर्लक्ष का, असा सवाल किशोर आत्राम, जि.प. सदस्य दिनेश टेकाम, अभिजित देशमुख, नीलेश भेंडे, विशाल बाबर, श्रीलेश पदवाड, भूषण साबळे, भूषण आत्राम, अमोल सोळंके, नीलेश दाबेकर आदींनी केला. विद्यार्थ्यांवरील अन्यायाला गृहपाल, गृहपाल प्रमुख जबाबदार असून, त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी, अशी मागणी करण्यात आली.गृहपाल, गृहपाल प्रमुखांवर कारवाईची आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यांच्या मागणीनुसार चौकशीअंती गृहपालाला हटविले जाईल. भोजन पुरविण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय होईल.- गिरीश सरोदेएटीसी, अमरावती.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांची एटीसीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:03 IST
स्थानिक कठोरा मार्गालगतच्या गजानन टाऊनशिप परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहातील समस्या, मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याप्रकरणी....
वसतिगृहातील विद्यार्थ्यांची एटीसीवर धडक
ठळक मुद्देगृहपालांचे निलंबन करा : आदिवासी अपर आयुक्तांची भेट घेऊन मांडली कैफीयत