आॅनलाईन लोकमततिवसा : तालुक्यातील पटसंख्या कमी असलेल्या सात शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बंद होत असलेल्या शाळांतील विद्यार्थी व पालकांनी जिल्हा क चेरीवर धडक दिली.इसापूर, काटसूर, वऱ्हा येथील मुलीची उर्दू शाळा, वंडली, चिखली, अमदाबाद, मालधूर येथील शाळांना सोमवारी सकाळी कुलूप लागले होते. शाळा बंद झाल्याची माहिती माहिती आ. यशोमती ठाकूर यांना पालकांनी दिली. त्यांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधला. यानंतर जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके, पूजा आमले, पं.स. उपसभापती लुकेश केने, जिल्हा नियोजन समिती सदस्य वैभव वानखडे यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर व जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी किरण कुळकर्णी यांना निवेदन दिले. यावेळी पालकांसह पं.स. सदस्य मंगेश भगोले, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रीतेश पांडव, नगरसेवक नरेंद्र विघ्ने, सरपंच वैशाली दिनेश लांडगे, संजय इंगळे, उपसरपंच चैताली इंगळे, शरद देशमुख, नितीन अर्डक, अमोल पन्नासे, समीर पठाण, विश्वजित बाखडे, सुरेश इंगळे, रोशन वानखडे व गावकरी उपस्थित होते.पालक संभ्रमातबंद झालेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले आहे. मात्र, शाळांचे अंतर लांब आहे, तर खासगी शाळेत शिक्षण घेणे शक्य नाही. यामुळे पालक संभ्रमात पडले आहेत.
विद्यार्थ्यांची जिल्हा कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 22:22 IST
तालुक्यातील पटसंख्या कमी असलेल्या सात शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
विद्यार्थ्यांची जिल्हा कचेरीवर धडक
ठळक मुद्देशाळा बंदचा निषेध : तिवसा तालुक्यातील सात शाळा बंद