आंदोलन : केबल जाळून केला निषेधअमरावती : शहर व राज्य महामार्गावर केबल टाकण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी न घेता अवैधरीत्या रस्त्याचे खोदकाम करणाऱ्या रिलायंस कंपनीच्या गैरकारभाराविरोधात मंगळवारी राजकमल चौकात विद्यार्थी स्वाभिमान संघटनेने केबल जाळून निषेध केला. याप्रकरणाला दोषी असणाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याची मागणीदेखील केली आहे.बडनेरा ते नवाथे आणि जुनीवस्ती बडनेरा ते नवीन वस्तीपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या राज्य महामार्गाच्या एका बाजूला कुठलीही परवानगी न घेता खोदकाम करून रिलायंस कंपनीचे केबल टाकण्याचे काम सुरू आहे. याशिवाय शहरातील कॉलनीमधील रस्ते खोदून ठेवले आहेत. केबल टाकण्यासाठी संबंधित कंपनीमार्फत रात्री दरम्यान खोदकाम केले जात आहे. नवाथे चौकात अवैध सुरू असलेल्या रिलायन्स कंपनीच्या कामांबाबत आमदार रवी राणा यांनी तातडीनेकाम थांबविण्याची सुचना विद्यार्थी स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केली त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी सदर काम बंद पाडून नियमबाह्य खोदकाम बुजवून या सर्व गैरकाराला दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विद्यार्थी स्वाभिमान संघटनेने केली आहे. यावेळी आंदोलनात विद्यार्थी स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, अभिजित देशमुख, नीलेश भेंडे, अनूज चुके, नितीन तायडे अनिकेत देशमुख, शुभम उंबरकर, अश्र्विन उके, आकाश राजगुरे व पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. दरम्यान, याबाबत तातडीने कारवाई न केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा विद्यार्थी स्वाभिमानने दिला आहे. (प्रतिनिधी)
रिलायन्स कंपनीच्या विरोधात विद्यार्थी स्वाभिमान आक्रमक
By admin | Updated: June 3, 2015 00:23 IST