शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

महामानवाच्या जयंतीला विद्यार्थ्यांच्या स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:12 IST

अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक १४ वडाळी येथे विद्यार्थ्यांकरिता ...

अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक १४ वडाळी येथे विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व स्पर्धेत प्रतिभा अभ्यंकर व रंगभरण स्पर्धेत हर्षकुमार बोबडे, तेजस वाघमारे विजयी ठरले. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सपना ठाकूर, मुख्याध्यापक योगेश पखाले, नीलिमा लव्हाळे, मोनिका पंधरे, चेतना बोडे, प्रियंका हंबर्डे, ज्योत्स्ना खडसे, प्रणिता देशमुख, स्मिता वानखडे, मनीषा वाकोडे, कान्होपात्रा बुरघाटे, सुनील दरोली, रूपाली आडोळे आदी शिक्षक उपस्थित होते. ------------

परिहारपुऱ्यात दारू अड्ड्यावर धाड

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान १२ एप्रिल रोजी परिहारपुऱ्यात दारू अड्ड्यावर धाड टाकली. यामध्ये २८८० रुपयांच्या ४८ नग देशीच्या पावट्या जप्त करण्यात आल्या. बंटी सिंग ऊर्फ हरप्रीतसिंग टांक (२७, रा. वडाळी) विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

------------------------

देशी दारूची अवैध विक्री

अमरावती : वडाळी स्थित देवीनगरात फ्रेजरपुरा पोलिसांना पेट्रोलिंगदरम्यान अवैधरीत्या देशी दारूची विक्री आढळली. ७२८ रुपयांची १४ पावट्या देशी दारू जप्त करण्यात आली. मनोहर रामचंद्र सरवरे (६५) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

- ----------------

६७६ रुपयांची देशी जप्त

अमरावती : नागपुरी गेट पोलिसांना रतनगंज दुसरा नागोबा ओटाजवळ पेट्रोलिंगदरम्यान अवैधरीत्या देशी दारूची विक्री होत असल्याचे आढळले. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवून ६७६ रुपयांची दारू जप्त केली.

------------------

१५ पिंप मोहा सडवा नष्ट

नांदगाव पेठ : जळका शहापूर शिवारात १५ पिंप मोहा सडवा नांदगाव पेठ पोलिसांनी १२ एप्रिल रोजी नष्ट केला. पोलिसांनी दिलीप जयस्वाल (५०, रा. टाकळी जहागीर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------------

गावठी दारू वाहून नेताना पकडली

अमरावती : रहाटगाव येथे डबकीत पाच लिटर गावठी दारू वाहून नेताना नांदगाव पोलिसांनी संजय सुरेश मोंढे (२९, रा. मिलिंदनगर, रहाटगाव) याला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------

मुलगा होत नसल्याने पत्नीचा छळ

अमरावती : मुलीच होत असल्याने दुसरे लग्न करण्याची तयारी चालविलेल्या मद्यपी पतीला लग्नास नकार दिल्याप्रकरणी मारहाण केल्याची घटना पारधी बेडा वडाळी येथे ११ एप्रिल रोजी घडली. महिलेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी सुमीत भोसले (४०) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------

नियमांचे उल्लंघन, तिघांविरुद्ध गुन्हा

अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी १२ एप्रिल रोजी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. सुरेश लक्ष्मणराव उभरकर (३७, रा. यशोदानगर), शेख आतिक शे. गफ्फार (३०, रा. व्यंकय्यापुरा), मो. सज्जाक शे. सत्तार (२६) अशी अशी आरोपींची नावे आहेत. ॉ

---------------------

त्रिसूत्रीचे उल्लंघनप्रकरणी गुन्हा

अमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन न केल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी भातकुली तहसीलसमोर युवकाविरुद्ध सोमवारी कारवाई केली. उस्मान कन्हैय पटेल (४५, रा. चिलमछावणी) असे आरोपीचे नाव आहे.

-------------

विनामास्क फिरणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा

अमरावती : सर्किट हाऊसनजीक विनामास्क बिनधास्त फिरताना आढळल्याने युवकाविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी कारवाई केली. उमेश रामकृष्ण ढोरे (३४, रा. आदर्श कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे.

------------

विनामास्क दुकानचालकाविरुद्ध गुन्हा

अमरावती : स्थानिक चपराशीपुऱ्यात दुकान उघडून विनामास्क ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसलेल्या दुकानदाराविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी सोमवारी गुन्हा नोंदविला. स्वप्निल ओंकार विंचूरकर (३०, रा. दस्तुरनगर)असे आरोपीचे नाव आहे.

---------------------

विनामास्क मांसविक्र करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

अमरावती : यशोदानगर चौकात विनामास्क बिनधास्त मांसविक्री करणाऱ्या युवकाविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा १२ एप्रिल रोजी गुन्हा नोंदविला. मयूर महादेवराव कु-हेकर (३०, संजय गांधीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

----------------------

विनामास्क ग्राहकसेवा बजावणाऱ्याविरुद्ध गुन्हा

अमरावती : स्थानिक यशोदानगर चौकात विनामास्क दुकान उघडून ग्राहकांना सेवा देणाऱ्या युवकाविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला. राहुल जानराव माहुरे (२१, यशोदानगर) असे आरोपीचे नाव आहे.

---------------

त्रिसूत्रीचे उल्लंघनप्रकरणी गुन्हा

अमरावती : यशोदानगर चौकात विनामास्क मांसविक्री करणाऱ्याविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला. अशोक आकाराम रावेकर (५६, रा. यशोदानगर) असे आरोपीचे नाव आहे.

----------------

मांसविक्रेत्याविरुद्ध नियमभंगाचा गुन्हा

अमरावती : स्थानिक कुंभारवाड्यात विनामास्क मांख विक्री करताना आढळल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी युवकाविरुद्ध मंगळवारी गुन्हा नोंदविला. शे. हुसेन शे. अनिस (२४, रा. चपराशीपुरा) असे आरोपीचे नाव आहे.

-----------

नियमाचे उल्लंघनप्रकरणी गुन्हा दाखल

अमरावती : तोंडाला मास्क न बांधता बिनधास्त वावरणाऱ्या युवकाविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी १२ एप्रिल रोजी भादंविचे कलम १८८, सहकलम २,३,४ अंतर्गत गुन्हा नोंदविला. किशोर उत्तमराव दुर्योधन (४२, रा. रमाबाई आंबेडकरनगर) असे आरोपीचे नाव आहे.

---------------