शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पभूधारक शेतकऱ्याची जगण्यासाठी धडपड

By admin | Updated: November 25, 2014 22:49 IST

मेळघाटातील आदिवासी बांधव कशाप्रकारे जीवन जगताहेत याचा प्रत्यय चाकर्दा येथील ‘दरोगा’ नामक शेतकऱ्यांचे वास्तव जाणून घेतल्यावर दिसून येते. अठराविश्वे दारिद्र्य आणि शिक्षणाची पायरी न

श्यामकांत पाण्डेय - धारणीमेळघाटातील आदिवासी बांधव कशाप्रकारे जीवन जगताहेत याचा प्रत्यय चाकर्दा येथील ‘दरोगा’ नामक शेतकऱ्यांचे वास्तव जाणून घेतल्यावर दिसून येते. अठराविश्वे दारिद्र्य आणि शिक्षणाची पायरी न चढलेल्या दरोगा पांडू बेठेकर याची रामकहानी ऐकल्यावर त्याचा संसार कसा चालतो याची कल्पनाच न केलेली बरी. दरोगाच्या वडिलांजवळ सात एकर शेती होती. वडिलांचा मृत्यूनंतर दरोगा व भाऊ बालाजी यांच्यात संपत्तीची वाटणी झाली. प्रत्येकाच्या वाट्याला साडेतीन एकर जमीन आली. दरोगाचे कुटुंबात पत्नी, तीन मुले, तीन सुना आणि सहा नातवांचा संसार असे एकूण १४ व्यक्तींचा मोठा परिवार. सुरूवातीच्या काळात दरोगाने इतरांकडे मोलमजुरीची कामे केली. मुले मोठी झालीत. घरात सुना आल्या आणि नातवांमुळे घर फुलून गेले. मात्र साडेतीन एकर शेतातून संसार चालविणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. तरीही न डगमगता त्याने आपले अवघे आयुष्य कुटुंबाच्या सावरासावर करण्यात वाहून दिले. आता मुले मोठी झाल्याने त्यांनीही आपापले हिस्से शेतात निर्माण केले. आता साडेतीन एकर शेताचे चार हिस्से पडले आहे. त्यामुळे किमान एक एकरही शेती पदरी नसताना उतारवयात दरोगाला स्वत:चे व पत्नीचे पालनपोषण करावे लागत आहे. शासनाकडून कोणतीही सुविधा नाही. शेताच्या पूर्वेकडून वाहणाऱ्या नाल्याने शेतात खरीपचे पीक हाती येत नव्हते. मात्र गेल्या वर्षी कृषी विभागाने नाला सरळीकरण व सिमेंट बंधारा बांधण्याची मोहीम राबविली. त्यामुळे शेताला लागूनच सिमेंट बंधाऱ्यात भरपूर पाणी गोळा झाला. आॅईल इंजिनच्या साह्याने शेतात ओलीत सुरू आहे. पहिल्यांदाच यावर्षी रबी हंगामात चांगले उत्पन्न होण्याची आशा दरोगाला आहे. बंधाऱ्याच्या काठावर तुरीचे पीक डौलदारपणे उभे आहे. आता गव्हासाठी शेतीची मशागत झाली आहे.