शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

‘ट्रायबल’मध्ये व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची धडपड, उच्चस्तरीय समिती गठित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 18:48 IST

Amravati : व्यवसाय प्रशिक्षण संस्था नव्याने निर्माण करणे ही बाब खर्चिक असल्याने केंद्रिय अर्थसहाय्यातून राज्यात शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेत ‘व्हीटीसी’ १४ ऑगस्ट १९९७ पासून सुरू करण्यात आले.

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील काही बंद, तर काही अल्प विद्यार्थी असलेले व्यवसाय प्रशिक्षण केंद्र (व्हीटीसी) पुन्हा सुरू करण्यासाठी धडपड सुरू आहे. ‘ट्रायबल’ने १ डिसेंबर रोजी शासनादेश जारी करून या प्रशिक्षण केंद्रांच्या मूल्यमापनासाठी एक उच्चस्तरीय समिती गठित केली आहे.

व्यवसाय प्रशिक्षण संस्था नव्याने निर्माण करणे ही बाब खर्चिक असल्याने केंद्रिय अर्थसहाय्यातून राज्यात शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेत ‘व्हीटीसी’ १४ ऑगस्ट १९९७ पासून सुरू करण्यात आले. यात गडचिरोली जिल्ह्यात दोन, रायगड व ठाणे जिल्ह्यात प्रत्येकी एक असे चार केंद्र सुरू झाले होते. तद्‌नंतर ३० जानेवारी २०१४ रोजीच्या शासनादेशानुसार ११ शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले.

हल्ली १५ पोस्ट बेसिक आश्रमशाळेत ‘व्हीटीसी’ सुरू असून, ११४ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. या योजनेसाठी २०१३ पासून केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही, मात्र, राज्य योजनेतून आतापर्यंत ‘व्हीटीसी’वर कोट्यवधी रुपये खर्च झाले. यात बहुतांश केंद्रांचे अभ्यासक्रम अद्ययावत नाहीत. काही ठिकाणी अल्प विद्यार्थी वा काही केंद्र बंद असताना खर्च सुरूच आहे. त्यामुळे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू ठेवावे अथवा नाही, यासाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली आहे.

तीन महिन्यांत समितीला अहवाल सादर करावा लागणार आहे. अगोदर तंत्र शिक्षण व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची वानवा असताना ‘ट्रायबल’ने व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू ठेवण्यासाठी चालविलेली धडपड शंका उपस्थित करणारी आहे. याबाबत आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता ते व्हीडीओ कॉन्फरसिंगमध्ये असल्याने उपलब्ध होऊ शकले नाही.

रोजगार न मिळणारे दिले प्रशिक्षणशासकीय आश्रमशाळांमधील व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात आदिवासी विद्यार्थ्यांना रोजगार न मिळणाऱ्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आल्याची ओरड आहे. गत सहा वर्षांपासून या केंद्रात केवळ प्रशिक्षणाच्या माध्यमातून पोपटपंची सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे वास्तव आहे.

‘व्हीटीसी’च्या मूल्यांकनासाठी ही आहे समितीव्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या मूल्यांकनासाठी समिती गठित करण्यात आली आहे. यात अध्यक्ष म्हणून पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थाचे आयुक्त, तर सदस्य म्हणून नाशिक, अमरावतीचे अपर आयुक्त, नाशिक येथील सहआयुक्त आणि राजूर, नागपूर, नाशिक, किनवट व जव्हार येथील प्रकल्प अधिकारी, तर सदस्य सचिव म्हणून पुणे येथील सहसंचालकांचा समावेश आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीbusinessव्यवसाय