शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'स्ट्रक्चरल ऑडिट' मध्ये आढळले ७५ 'डेंजर' जुने पूल आणि रस्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 11:22 IST

Amravati : क्षतिग्रस्त रस्ते, पूल, संरक्षण भिंत दुरुस्तीसाठी सात कोटींचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : धोकादायक पूल आणि इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जून महिन्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत बांधकाम विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बांधकाम विभागाने केलेल्या वर्ष २०२३-२४ मध्ये केलेल्या 'स्ट्रक्चरल ऑडिट'मध्ये आढळले ७५ धोकादायक जुने पूल व रस्ते आढळले आहे. या कामांसाठी सुमारे सात कोटींचा प्रस्ताव राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे सादर केला आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यात जुने पूल, नादुरुस्त रस्त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पृष्ठभूमीवर 'झेडपी'चे अतिरिक्त सीईओ संतोष जोशी यांनी बांधकाम विभागाकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला होता. या बैठकीत जिल्ह्यातील धोकादायक इमारती व पूल, रस्त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत अधिनस्त यंत्रणेला दिले होते. त्यानुसार बांधकाम विभागाच्या सात उपविभागामार्फत गतवर्षी अतिवृष्टी व पूरहानीमुळे धोकादायक रस्ते व पुलांचे ऑन दी स्पॉट स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यामध्ये झेडपी बांधकाम विभागाकडे सात हजार किलोमीटरचे रस्ते, जिल्हा ग्रामीण रस्ते आहेत. ८५ कि. मी. चे ५४ रस्ते, १५ पूल, रपटे, मोऱ्या नादुरुस्त असल्याचे आढळून आले आहेत. तसा अहवाल सीईओ, अतिरिक्त सीईओकडे सादर करण्यात आला होता. या अहवालानुसार बांधकाम विभागाने सीईओ, अतिरिक्त सीईओ यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड यांनी ग्रामविकास विभागाकडे या कामांसाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.

८८ पैकी ७५ रस्ते अतिशय खराब"जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारितील ग्रामीण भागातील रस्ते, पूल व नाल्या आदींचे यंत्रणेकडून स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. यामध्ये वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ८८ पैकी ७५ रस्ते अतिशय खराब झाले आहेत. ते दुरुस्त करणे आवश्यक आहे. याकरिता निधी मागणीचा प्रस्ताव वरिष्ठांच्या मार्गदर्शनात शासनाकडे पाठविला आहे."- दिनेश गायकवाड. कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग

टॅग्स :Amravatiअमरावतीroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक