शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

राज्यातील २९०० पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट पूर्ण, ११२३ पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याचा कालबद्ध कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 20:48 IST

अमरावती : गतवर्षी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीचा पूल वाहून गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने राज्यभरातील साठ मीटरपेक्षा अधिक लांबीच्या जुन्या व ब्रिटिशकालीन अशा २९०० पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले.

अमरावती : गतवर्षी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीचा पूल वाहून गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने राज्यभरातील साठ मीटरपेक्षा अधिक लांबीच्या जुन्या व ब्रिटिशकालीन अशा २९०० पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले. यापैकी ११२३ पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याचा एक वर्षाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यासाठी १७९२ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. जिल्ह्यातील ४७ पुलांचे आॅडिट करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.गतवर्षी सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग असो की राज्य महामार्ग, सर्वच धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सावित्रीच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वच पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या वर्षभरात या पुलाचे आॅडिट करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. अमरावती जिल्ह्याचा विचार करता राष्ट्रीय महामार्गावर ब्रिटिशकालीन पूल आहेत, तर काही पूल स्वातंत्र्योत्तर काळातील आहेत; परंतु तेही आता धोकादायक झाले आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत आता नवीन पूल बांधले जाणार आहेत.राज्य शासनाने राज्यातील पुलांच्या दुरुस्तीसाठी प्रथमच १८४ कोटी इतक्या भरीव रकमेची तरतूद केली आहे. वर्षभरात १६ पुलांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. दुरुस्तीची अचानक गरज भासल्यास ५० लाखांपर्यंत खर्चाचे अधिकार मुख्य अभियंत्यांना दिले आहेत. ५० लाखांपेक्षा अधिक खर्च असल्यास ४८ तासांत मंत्रालयातून मंजुरी व आठ दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे नवीन धोरण आखण्यात आले आहे. नाबार्ड अंतर्गत तीन वर्षांत ग्रामीण भागात ७४२ पुलांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.पुलाचा धोका टाळण्यासाठी सेन्सर प्रणालीपावसाळ्यात पुराचा धोका टाळण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाच्या पुलांना सेन्सर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील महत्त्वाच्या दोनशेपेक्षा जास्त पुलांना इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर बसविण्यात आले आहेत. पुराच्या पाण्याने धोकादायक पातळी ओलांडल्यास ही बाब जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन यंत्रणेस धोक्याचा अलार्म वाजवून सूचित केले जाते.

टॅग्स :Amravatiअमरावती