शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वनबल प्रमुख पदासाठी जोरदार रस्सीखेच; सुनीता सिंह, शैलेश टेभुर्णीकर यांच्यात चुरस

By गणेश वासनिक | Updated: August 20, 2023 16:55 IST

वनविभागाच्या वनबल प्रमुख पदावर आतापर्यंत उत्तर, दक्षीणेकडील राज्यातील आयएफएस अधिकाऱ्यांना सन्मान मिळालेला आहे.

अमरावती: राज्याच्या वन विभागाचे वनबल प्रमुख वाय.एल.पी. राव हे ऑगस्ट अखेर सेवानिवृत्त होत आहे. राव यांच्या नंतर प्रथमच वनबल प्रमुख पदी मराठी माणूस विराजमान होण्याची शक्यता असताना दुसरीकडे या पदावर वन विभागाच्या ईतिहासात महिला धुरा सांभाळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सुनीता सिंह की शैलेश टेभुर्णीकर? या दोन वरिष्ठ आयएफएस पैकी कोणाची वर्णी लागणार याकडे नजरा लागल्या आहेत.

वन विभागाचा कारभार नागपूर येथील वनबल भवनातून चालतो. आयएएस, आकयपीएस प्रमाणे उपवनसंरक्षक दर्जाचे अधिकारीआयएफएस कॅडरने नियुक्त केले जातात. पुढे हेच डीएफओ वनसंरक्षक ते प्रधान मुख्य वनसंरक्षक, वनबल प्रमुख पदापर्यंत मजल गाठतात. गृह विभागात पोलिस महासंचालक तर वन विभागात वनबल प्रमुख हे पद समकक्ष असून, प्रत्येक अधिकाऱ्यांना एक वर्षाचा कार्यकाळ मिळतो. राज्याच्या वन विभागाचे सर्वेसर्वा असलेले वनबल प्रमुख पदी सध्या वाय.एल.पी. राव हे ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होत असल्याने या पदाच्या खुर्चीवर कोणाची वर्णी लागते, याकडे वन विभागातील ‘टॉप टू बॉटम’ अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.मराठी की अमराठी कोणाची होणार नियुक्ती?

वनविभागाच्या वनबल प्रमुख पदावर आतापर्यंत उत्तर, दक्षीणेकडील राज्यातील आयएफएस अधिकाऱ्यांना सन्मान मिळालेला आहे. अलीकडे रामबाबू यांच्यानंतर राव हे दक्षिणात्य अधिकारी या पदावर विराजमान झाले. आता राव हे सेवानिवृत्त होतअसताना पहिल्यांदाच वनबल प्रमुखपदी मूळ नांदेड जिल्ह्यातील रहिवासी तसेच सध्या कॅम्पा विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे १९८७ च्या बॅचच्या आयएफएस सुनीता सिंह यांचे नाव देखील पुढे येत आहे. सुनीता सिंह यांच्यापेक्षा शैलेश टेंभुर्णीकर हे सिनिअर असल्याने राज्य शासन टेंभुर्णीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकतात. असे झाले तर वनबल प्रमुखपदी पहिले मराठी अधिकारी ते असतील. तर दुसरीकडे वन्यजीव विभागाचे प्रमुख महिप गुप्ता हे सुद्धा जोर लावत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती