शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बेपर्वाई आढळल्यास कठोर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

नागरिकांनीही शिस्तभंग करून आपले व इतरांचेही अमूल्य जीवन धोक्यात जाईल, असे वर्तन करू नये. जिल्ह्यात एका मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनावर मात करणे हे आव्हान आहे. त्यामुळे नागरिकांनीही शिस्त पाळली पाहिजे.

ठळक मुद्देयंत्रणांना पालकमंत्र्यांची तंबी : शिस्तभंग करू नका, नागरिकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवकांवर गृहभेटीची जबाबदारी आहे. या कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. सर्व यंत्रणा चांगले काम करत आहे. मात्र, कुठेही बेजाबदारपणा आढळल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी दिला.नागरिकांनीही शिस्तभंग करून आपले व इतरांचेही अमूल्य जीवन धोक्यात जाईल, असे वर्तन करू नये. जिल्ह्यात एका मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनावर मात करणे हे आव्हान आहे. त्यामुळे नागरिकांनीही शिस्त पाळली पाहिजे.आपल्या बेजबाबदार वर्तनाने केवळ स्वत:लाच नव्हे, तर इतरांनाही धोका होऊ शकतो, याचे भान ठेवावे. ताप, खोकला, श्वसनक्रियेत अडथळा अशी कुठलीही तक्रार असल्यास त्याची माहिती पथकाला द्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.सहायता केंद्रात १८ जणांचे पथकनागरिकांच्या सुविधेसाठी जिल्हा रुग्णालय व सुपरस्पेशालिटी रुग्णालयात सहायता केंद्रे सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. येथे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका यांच्याकडून १८ जणांचे पथक काम करेल. प्रवासी नागरिक, मजूर बांधव यांच्यासाठी जिल्ह्याप्रमाणेच प्रत्येक तालुक्यात निवारा केंद्रे सुरू केलेली आहेत. त्यांची भोजन, निवास, आरोग्य दक्षता आदी व्यवस्था करण्यात आल्याचे ना. ठाकूर म्हणाल्या.सुपरस्पेशालिटीत तपासणी करासुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कोविड रूग्णालय सुरू करण्यात येत आहे. सर्दी, ताप, न्युमोनियाची लक्षणे असणाºया रुग्णांनी सरकारी रुग्णालयात, कोविड चाचणी केंद्रात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. या रूग्णालयात डॉक्टर, पारिचारिका, सुरक्षारक्षक असा १०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्टॉफ नियुक्त असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYashomati Thakurयशोमती ठाकूर