शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

अतिक्रमणधारकांच्या वाकुल्या

By admin | Updated: April 30, 2016 00:20 IST

शहरातील पदपथासह विविध मोक्याच्या ठिकाणी राजरोसपणे अतिक्रमण कायम असताना महापालिकेतील पथक मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.

आर्थिक बिदागीचा आरोप : महापालिकेचे पथक निद्रीस्त!अमरावती: शहरातील पदपथासह विविध मोक्याच्या ठिकाणी राजरोसपणे अतिक्रमण कायम असताना महापालिकेतील पथक मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. त्यामुळे या पथकाकरिता आर्थिक बिदागी मिळत असल्याच्या आरोपाला बळ मिळत आहे.मार्च अखेरपर्यंत पालिकेतील अतिक्रमणविरोधी पथकाने शहरातील विविध भागांत अतिक्रमण विरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. यात अतिक्रमणधारकांवर फौजदारी कारवाई करण्यासोबतच काहींचे साहित्य जप्त, तर काहींवर दंडाचा बडगा उगारला गेला आहे. तथापि त्यानंतर एप्रिल महिन्यानंतर ही मोहीम पूर्णपणे थंडावली आहे.शहरातील शामचौक, जयस्तंभ, चित्रा, सरोज, राजकमल चौकासह नमुना, राजापेठ, अंबागेट, गांधी चौक, नवाथे, विलासनगर, बडनेरा रोड, पंचवटी, मोर्शी रोड, उड्डाणपूल, गाडगे नगर, राठीनगर, राधानगर यांसह बापट चौक, नगर वाचनालय, इतवारा व बसस्थानक परिसर ही ठिकाणे अतिक्रमणधारकांचे हक्काचे आश्रयस्थान बनले आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते संकुचित बनले असताना वाहतुकीचा बट्याबोळ रोजच्याच जगण्याचा एक भाग बनून राहिला आहे. शहरातील पदपथ दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी पदपथाची दारुण अवस्था झाली आहे. एखादा अपघात किंवा अनुचित घटना घडल्यास अतिक्रमणावर उपाययोजनांचा रतीब घातला जात आहे. तोंडदेखल्या कारवाया केल्या जात असून दोन दिवसांनंतर परिस्थिती जैसे थे, अशी स्थिती पहावयास मिळत आहे. ही समस्या कायमस्वरुपी निकाली काढणे शक्य होत नाही.फूड झोनला वरदहस्त कुणाचा ? नवाथे चौकासह नमुना, अंबागेट, गांधी चौक, शामनगर कॉर्नर, बसस्थानक ते रुख्मिणीनगरचा पदपथ आणि प्रशांतनगरच्या बगिच्यासमोरच्या भागाला अघोषित फुडझोनचे स्वरुप प्राप्त झाले आहे. गणेश कुत्तरमारे यांच्या नेतृत्वातील पथकाने या अवैध व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा असताना त्यांच्या मात्र कारवाई करण्यात कुणीही पुढे येत नाही. त्यामुळे या राजरोस अतिक्रमणाला आश्रय कुणाचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रुख्मिणीनगरचे बसस्थानक मार्गावरील पदपथावर लागत असलेल्या हातगाड्यांवर तर अवैधरित्या दारू विक्री केली जाते. मात्र त्या अतिक्रमितांकांवर कुत्तरमारे यांच्या पथकाने कधी कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. पाठशिवणीचा खेळ प्रचंड प्रसिद्ध आणि पोलिसी लवाजम्यात राणा भीमदेवी थाटात अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई केली जाते. मात्र दुसऱ्याच दिवशी तर काही भागात या पथकाची पाठ फिरताच अतिक्रमण ‘जैसे थे’ होेते. आपण संबंधित अधिकाऱ्याला महिन्याकाठी निश्चित अशी बिदागी देतो. त्यामुळे भीती कशाची, अशा आविर्भावात अतिक्रमणधारकांचा संवाद चालतो. जीवघेणा खेळ मध्यवर्ती बसस्थानकासह राजापेठ बसस्थानक परिसर वाहतुकीचा जीवघेणा खेळ सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अगदी रस्त्यावर हातगाड्या व अन्य अतिक्रमण थाटल्यामुळे हे मध्यवर्ती चौक मृत्यूचे पिंजरे बनले आहेत. पदपथावरून जायला जागा नाही. रस्ता आजूबाजूलाही फेरीवाल्यांचे अतिक्रमण, पादचाऱ्यांनी जायचे कुठून, असा प्रश्न असताना निव्वळ घोषणाबाजी करून उपाययोजनांची कागदावर अंमलबजावणी सुरू आहे. आमसभेतही आवाजशहरातील अतिक्रमणधारकांवर फौजदारी कारवाई करावी, शहरातील रस्ते अतिक्रमणयुक्त करावेत, अशी मागणी नगरसेवकांकडून वारंवार केली जाते. तथापि त्या प्रस्तावांवर कधीही फारशी चर्चा होत नाही. कारवाई सुरूच आहे, असे ठेवणीतील उत्तर देऊन प्रस्ताव हातावेगळा केला जातो. त्यामुळे अतिक्रमणावर कारवाई करण्याचा देखावा केला जात असल्याच्या आरोपाला पुष्टी मिळत आहे.