शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

ट्रक पार्किंगवरून तुफान दगडफेक; तलवारीही निघाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:30 IST

नागपुरी गेट पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डिप्टी ग्राऊंडमध्ये ट्रक पार्किंगच्या मुद्द्यावरून दोन गट परस्परांशी भिडले. यादरम्यान परस्परांवर दगडफेक करण्यात आली. तलवारीही उगारण्यात आल्या. ही घटना मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास उघड झाली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी दोन गटांतील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेने मुस्लिमबहुल क्षेत्रात मोठी खळबळ माजली होती.

ठळक मुद्देपाच जण ताब्यात : फायरिंगची अफवा, परिस्थिती तणावपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डिप्टी ग्राऊंडमध्ये ट्रक पार्किंगच्या मुद्द्यावरून दोन गट परस्परांशी भिडले. यादरम्यान परस्परांवर दगडफेक करण्यात आली. तलवारीही उगारण्यात आल्या. ही घटना मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास उघड झाली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी दोन गटांतील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेने मुस्लिमबहुल क्षेत्रात मोठी खळबळ माजली होती.कुणीही या घटनेत जखमी झाले नसले तरी या प्रकाराने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. भरीस भर याच घटनेदरम्यान हवेत गोळीबार झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे दहशतीत भर पडली. वाढता तणाव पाहता, पोलिसांनी व्यापक बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे डिप्टी ग्राऊंड परिसराला पोलीस छावणीला स्वरूप प्राप्त झाले.वलगाव रस्त्यावरील ट्रान्सपोर्टनगरमध्ये ट्रक पार्क केले जातात. माहितीनुसार, ट्रकचालक मोहसीनखान याचा ट्रक लावणयाच्या कारणावरून अन्य एका चालकाशी वाद झाला. तेथे दोघांमध्ये मारहाण झाली. हा वाद निवळल्यानंतर ज्या ट्रकचालकास मारहाण करण्यात आली. त्याच्या समर्थनार्थ एहफाज अहमद बाहेर पडला. त्याला मोहसीन व त्याचे अन्य साथीदार डिप्टी ग्राऊंड भागात दिसले. तेथे दोघांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसान दगडफेक व परस्परांवर तलवारी उगारण्यापर्यंत झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके व शशिकांत सातव यांच्यासह नागपुरी गेट ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नागपुरी गेट पोलीस ठाण्यासह अन्य ठाण्यांतील पोलीस ताफा तैनात करण्यात आला. क्यूआरटी व दंगा नियंत्रण पथकही सज्ज ठेवण्यात आले. दोन्ही गटांतील १०० ते १५० जण परस्परांसमोर ठाकल्याने तणाव निर्माण झाला. सशस्त्र जमावापैकी काहींनी हवेत गोळीबार केल्याची अफवा पसरली. तथापि, या वादादरम्यान गोळीबार झाल्याच्या वृत्ताचे नागपुरी गेट पोलिसांनी जोरदार खंडन केले.दरम्यान, वाद निवळल्यानंतर या प्रकाराची माहिती अहफाजला देण्यात आली. मोहसीन हा मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्याला देण्यात आल्याने प्रत्युत्तरादाखल अहफाज पहिलवानने सशस्त्र डिप्टी ग्राऊंड परिसरात राहणाऱ्या मोहसीनच्या घरावर हल्लाबोल केला. त्यातून दगडफेक व तलवारी उगारण्यात आल्या.यांना घेतले ताब्यातएका गटातील एहफाज अहमद इजाज अहमद (३८, रा. जाकीर कॉलनी) व दुसऱ्या गटातील शेख शौकत शेख ताजू (३४), शेख राजिक शेख असद (३२), शेख हनिफ शेख ताजू (४७) व मोहसीन खान शफीक खान (२०, रा. अंसारनगर) यांच्याविरुद्ध कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३३६, आर्म अ‍ॅक्ट ४, २५, १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.ट्रक पार्किंगवरुन दोन गटांमध्ये वाद उफाळून आला. वादादरम्यान दगडफेक करण्यात आली. तलवारी निघाल्या. तथापि, या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. गोळीबार झालेला नाही.- दिलीप चव्हाणठाणेदार, नागपुरीगेट