शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वादळाचा शहराला तडाखा, झाडांखाली दबल्या कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 05:00 IST

शहरात दुपारी १.१० पासून सुमारे २० मिनिटे वादळासह मान्सूनपूर्व पावसाने शहरात अनेक ठिकाणी नुकसान झाले. कॅम्प परिसरात झाड पडल्याने त्याखाली कार दबली. राधानगरातदेखील झाड पडल्याने कार दबल्याचे घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी टळली. याशिवाय पीडीएमएमसी मार्गावर फांद्या पडल्याने विद्युत तारा तुटल्या. रामपुरी कॅम्प भागात हीच स्थिती दिसून आली.

ठळक मुद्देफांद्या तुटल्या, वीजवाहिन्या विस्कळीत, अर्ध्याअधिक शहराची वीज गूल, पाच दुचाकींचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तौक्ते वादळामुळे झालेल्या हवामानशास्त्रीय बदलाने रविवारी दुपारी मान्सूनपूर्व वादळासह पावसाने शहराला चांगलाच तडाखा दिला. अनेक भागांतील वृक्ष उन्मळून पडले. त्याखाली कार दबली, काही भागातील टिनपत्रे उडाली, जाहिरातीची फलके पडली. झाडांच्या फांद्यांमुळे विद्युत तारा तुटल्या. अर्ध्याअधिक शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागालादेखील या वादळाने तडाखा दिला.  शहरात दुपारी १.१० पासून सुमारे २० मिनिटे वादळासह मान्सूनपूर्व पावसाने शहरात अनेक ठिकाणी नुकसान झाले. कॅम्प परिसरात झाड पडल्याने त्याखाली कार दबली. राधानगरातदेखील झाड पडल्याने कार दबल्याचे घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी टळली. याशिवाय पीडीएमएमसी मार्गावर फांद्या पडल्याने विद्युत तारा तुटल्या. रामपुरी कॅम्प भागात हीच स्थिती दिसून आली. याशिवाय सायन्सकोर शाळेवर छपराची टिनपत्रे उडाली. विभागीय क्रीडा संकुलातील झाडांच्या फांद्या तुटल्या अन् शेडचे टिन वाकले. अनेक भागात झाडांखाली फळांचा खच लागला होता. बडनेरा शहरातही वादळी वाऱ्याचा फटका बसला. रेल्वे पुलावरील जाहिरातीचे फलक कोसळून खाली पडले. सीमेंट रस्तेनिर्मितीच्या कामांना तूर्त ब्रेक लागला आहे. भातकुली शहरातही वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळासह पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली. अनेक परिसरातून रस्त्याने पाणी वाहिले. वादळ शमताच मान्सूनपूर्वीच्या पावसाचा बच्चेकंपनीने आनंद लुटला. संचारबंदी असल्याने रस्त्यांवर तुरळक वाहन असल्याने कुठलेच नुकसान झाले नसल्याचे दिसून आले. 

२२ पर्यंत ढगाळ वातावरण राहणार कायमअरबी समुद्रातील चक्रीवादळ तसेच विदर्भावर असलेले चक्राकार वारे आणि अन्य हवामान शास्त्रीय परिस्थितीमुळे विदर्भात पुढील पाच दिवस कमी-जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण २२ तारखेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. तापमानात विशेष बदल नसल्याची माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.

पावसानंतर अंगाला लागल्या घामाच्या धारावेगवान वाऱ्यांनी धडकी भरवली, त्यानंतरच्या पावसामुळे काही मिनिटांसाठी गारवा तयार झाला. मात्र, दुपारी २ पासून पुन्हा सूर्याने दर्शन दिले. यादरम्यानच्या काळात हवा वाहत नसल्याने दमट वातावरणाचा अनुभव  अमरावतीकरांनी घेतला. अंगावरून घामाच्या धारा वाहत असताना, वीज गूल झाल्याने प्रत्येक क्षण जिवाची तगमग वाढवित होता.   राजकमल, एल.आय.सी. श्रीकृष्ण पेठ, मोरबाग, वडाळी, बडनेरा, टाऊन-३ आणि लक्ष्मीनगर फीडरवरून शहराला होणारा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे महावितरणचे फोन खणखणत होते. 

 

टॅग्स :Rainपाऊस