लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : तालुक्यातील सांगळुद येथील जलसंधारण विभागाचे शेततळे वजा साठवण तलाव ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने सुमारे २०० एकर जमीन तलावसदृश झाल्याने पिके नेस्तनाबूत झालीत, शिवाय साठवण तलावातील मत्स्यबीज व लाखो रुपयांचे मासे वाहून गेले. तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.भागडी नाल्यालगतचा मासोळी तलाव म्हणून प्रसिद्धी पावलेल्या या साठवण तलावात सांगळुद येथील युवा शेतकरी विनय गावंडे, शरद आठवले व वीरेंद्र मोहोड यांनी शासनाकडे शुल्क जमा करून मत्स्योत्पादन घेण्यासाठी शेततळ्यात लाखो रुपयांचे मत्स्यबीजे टाकली. त्यातून अर्धा ते एक किलो वजनाच्या शेकडो मासोळ्या तयार झाल्या.साठवण तलावात क्षमतेपेक्षा अधिक जलसंचय झाल्याने ते मासे वाहून गेले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सांगळूद येथे दहा एकराच्या विस्तीर्ण परिसरात जलसंधारण विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मासोळी प्रकल्पाच्या तलावाचे इनलेट व आऊटलेट फुटल्याने हा कहर उडाला. शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे.नुकसानभरपाईची मागणीमासोळी तलाव फुटल्याने आजूबाजूच्या शेतामधील पीकही खरडून वाहून गेले. महसूल विभागाने तात्काळ उपाय योजना करून सर्व शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करून हेक्टरी २५ हजार रुपये तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी रवि कोरडे, प्रवीण कावरे, असलम देशमुख, ओमप्रकाश कंकाले, प्यारेलाल वर्मा, नूर अहमद देशमुख, जगत जावरकर, गणेश गिरे आदींनी केली आहे. सासन रामापूर व सासन बु. या दोन गावांना जोेडणारा पूल पाण्याखाली आल्याने दोन्ही बाजूकडील संपर्क तुटला.भाडेतत्त्वावर घेतला, पावसाने हिरावलागावातील तीन युवकांना हा तलाव भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. या तलावात भागडी नाल्याचे पाणी साठविले जाते. ४ ते ५ लाख रुपये खर्च करून त्या युवकांनी तलावात मत्स्यबीज वाढविले होते. तालुक्यात संततधार बरसणाºया पावसाने परिसरातील नाल्यांना पूर आला आहे. भागडी नाला तुडुंब भरून वाहिल्याने साठवण तलावात पाण्याचा मोठा साठा झाला. पाण्याच्या अत्याधिक दाबाने तलावाचे इनलेट व आऊटलेट फुटले. त्यामुळे तलावातील लाखो रुपयांचे मासे वाहून गेले. सुमारे २० ते २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.
साठवण तलाव फुटला - मासे अन् मत्स्यबीज गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:38 IST
तालुक्यातील सांगळुद येथील जलसंधारण विभागाचे शेततळे वजा साठवण तलाव ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने सुमारे २०० एकर जमीन तलावसदृश झाल्याने पिके नेस्तनाबूत झालीत, शिवाय साठवण तलावातील मत्स्यबीज व लाखो रुपयांचे मासे वाहून गेले.
साठवण तलाव फुटला - मासे अन् मत्स्यबीज गेले वाहून
ठळक मुद्देसांगळुद येथील घटना : शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान