शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

प्रकल्पग्रस्तांचा रहाटगाव टी-पॉर्इंटवर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 23:07 IST

जिल्हा व तालुकास्तरावर प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो उधळून लावला. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीने पोलिसांच्या कृतीचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्दे२२ जणांना अटक : पोलीस कारवाईचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा व तालुकास्तरावर प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो उधळून लावला. विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीने पोलिसांच्या कृतीचा निषेध नोंदविला.शासनाने २६ जून २००६ रोजी परिपत्रक काढून शेतकऱ्यांच्या जमिनी सरळ वाटाघाटीने संपादित केल्याचे कागदोपत्री दर्शवून भूसंपादन कायदा कलम ४ ची भीती घालून दहशत निर्माण केली. सन २००६ पासून निर्माण झालेल्या व प्रक्रियेत असलेल्या प्रकल्पांसाठी शासनाने शेतकऱ्यांच्या अशाप्रकारे अल्प दरात जमिनी अधिग्रहीत केल्या. सदर प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. प्रत्येक शेतकºयाला वेगवेगळ्या दराने मोबदला देण्यात आला. तो सन २०१३ च्या जीआरनुसार ठरवून फरकाची रक्कम संबंधित शेतकºयांना द्यावी. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी. अल्प मोबदल्यामुळे घर न झाल्याने अनेकांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे दिसून येत आहे. या मुद्द्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वात रहाटगावजवळील टी-पॉर्इंटवर गुरुवारी सकाळी १०.३० वाजता चक्काजाम आंदोलनासाठी आंदोलक पोहोचले. त्यांनी वाहतूक रोखून धरली होती. मात्र, गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा ताफा आंदोलनस्थळी पोहोचला आणि समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्यासह २९ जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये पंडित बिसेवार, अमोल ठाकूर, अमित चव्हाण, अंकुश चवरे, राहुल पाटघरे, विजय मोहोड, प्रल्हाद गुजर गजानन गिरनार, रावसाहेब भटकर, राहुल पेठेकर, महादेवसिंह चव्हाण, अशोक मोहोड, पांडुरंग मुंडे, शुभम पाटील, अजय मोहोड, उमेश कुरवाडे, भोजराज वानखडे, दीपक शिंगाडे, सुधाकर पाचोड, अशोक गजभिये, रवि बद्रिया, वासुदेव इंगळे, शालिग्राम कडू, राजकुमार कडू, गोवर्धन थोरात व अन्य तीन महिलांचा समावेश आहे. उपनिरीक्षक एम.जी. सामटकर यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३४१ व मपोका १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. स्थानबद्ध करून गाडगेनगर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.न्यायालयात बेमुदत उपोषण करणारविदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांची गुरुवारी दुपारी २ वाजता पत्रपरिषद होती. मात्र, आंदोलनस्थळाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पत्रपरिषद होऊ शकली नाही. त्यांनी जामीन न घेता कारागृहात जाण्याची तयारी दर्शविली असून, तेथे बेमुदत उपोषण करणार असल्याचे भ्रमणध्वनीद्वारे पत्रकारांना सांगितले.