वाहतूक ठप्प : ‘चाय गरम, कॉफी गरम; नितीन गडकरी बेशरम’बडनेरा : वेगळ्या विदर्भासह इतर मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने बुधवार ११ जानेवारी रोजी येथील सावता मैदानासमोरील महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने विदर्भवादी सहभागी झाले होते. याआंदोलनामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प होती.जिल्हाभरातून विदर्भवादी या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात नारेबारी करीत लवकरात लवकर वेगळा विदर्भ झाला पाहिजे, विदर्भातील शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, लोडशेडींग पूर्णपणे बंद करा, पूर्णदाबाचा वीज पुरवठा मिळावा, विदर्भात वने व लोहखनिजांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्यावर आधारित उद्योग विदर्भातच निर्माण करण्यात यावेत, अशा विविध मागण्या लाऊन धरण्यात आल्यात. ‘महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा, विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, चाय गरम-कॉफी गरम, नितीन गडकरी बेशरम’ अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. आंदोलनात राजेंद्र आगरकर, नंदू खेरडे, ताराबाई बारस्कर, रंजना मामर्डे, रियाज खान, कृष्णराव पाटील, नाना बोंडे, अरूण साकोरे, सुनील शेरेवार, रंजना साकोरे, दिनकर निस्ताने, विजय मोहोड, सतीश प्रेमलवार, साहेबराव इंगळे, बाबाराव अब्रुक, गुलाबराव कोल्हे, प्रकाश शिरभाते, नंदेश अंबाडकर, वामनराव अब्रुक यांच्यासह अनेक विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. बडनेरा पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली. आंदोलनादरम्यान शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
वेगळ्या विदर्भासाठी बडनेऱ्यात ‘रास्ता रोको’
By admin | Updated: January 12, 2017 00:11 IST