लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : विशिष्ट समुदायामधील दोन गटांमध्ये शनिवारी रात्री झालेल्या हाणामारीनंतर एका गटाकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आली. यात सहभागी आरोपींचे धारणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून अटकसत्र सुरू केले. यादरम्यान शहरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला. दगडफेकीच्या घटनेला पोलीस यंत्रणेने दुजोरा दिला नाही; मात्र शासकीय कामात अडथळा, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन व जमाव केल्याबाबत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.शहरात एका भागातील विशिष्ट समुदायातील दोन गट शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास किरकोळ कारणावरून एकमेकांसमोर उभे ठाकले. एक गट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवित असताना, दुसऱ्या गटाच्या २५ ते ३० जणांकडून इमारतीवर दगडफेक करण्यात आली.उपनिरीक्षक चापले यांच्या फिर्यादीवरून भादंविचे कलम ३५३, ३३२, ३३६, ३२३, १४३, १४७, १४९, १८८ अन्वये दाखल करण्यात आले. याशिवाय कलम ५१ (ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कलम ३ साथरोग प्रतिबंधक कायद्याप्रमाणे सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. शेख अजमेर शेख असगर (२५, रा. उतावली), हसन खान युनूस खान (४२, रा. दुबई मोहल्ला), मेहबूब मो. मेहदूद खान (४९) व मो. असलम मो. युनूस (३८) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. उर्वरितांचा शोध सुरू आहे.शोधमोहिमधारणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. २१ महिला आणि पुरुष जवानांचा समावेश असलेल्या दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले आहे. ठाणेदार लहुजी मोहंडुले तपास करीत आहेत. चार वर्षांपूर्वी वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावर काही युवकांनी पोलीस ठाण्यात तोडफोड केली होती. त्यावेळेही दगडफेक झाली होती.काही जणांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. कुठलीही वित्तहानी झाली नाही. आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली आहे.- संजय काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, धारणी
धारणी पोलीस ठाण्यावर दगडफेक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:01 IST
शहरात एका भागातील विशिष्ट समुदायातील दोन गट शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास किरकोळ कारणावरून एकमेकांसमोर उभे ठाकले. एक गट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवित असताना, दुसऱ्या गटाच्या २५ ते ३० जणांकडून इमारतीवर दगडफेक करण्यात आली. उपनिरीक्षक चापले यांच्या फिर्यादीवरून भादंविचे कलम ३५३, ३३२, ३३६, ३२३, १४३, १४७, १४९, १८८ अन्वये दाखल करण्यात आले.
धारणी पोलीस ठाण्यावर दगडफेक !
ठळक मुद्देआपसी वादातून हल्ला : अतिरिक्त बंदोबस्त, चार जणांना अटक