शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

संत्रा, केळी, कपाशीवर आघात

By admin | Updated: October 1, 2014 23:16 IST

नैसर्गिक आपत्तींमुळे २०१४ हे वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत त्रासदायक ठरले. मृग नक्षत्राच्या सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांनी धक्क्यावर धक्के दिले. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या गर्तेत अडकला. कर्जाच्या विवंचनेत

अरुण पटोकार - पथ्रोटनैसर्गिक आपत्तींमुळे २०१४ हे वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत त्रासदायक ठरले. मृग नक्षत्राच्या सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांनी धक्क्यावर धक्के दिले. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या गर्तेत अडकला. कर्जाच्या विवंचनेत त्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील एका संत्राबागाईतदाराने आत्महत्या केल्याने ही बाब स्पष्ट झाली आहे. दीड महिना पावसाने दांडी मारल्याने पेरणीला विलंब झाला. परिणामी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता बळावली आहे. कशीबशी उशिराने पेरणी आटोपली. पण, लगेच जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली. हा निसर्गाने दिलेला पहिला धक्का. दुबार पेरणी करून शेतकऱ्यांनी कसेबसे सोयाबीन, कपाशी, तुरीचे पीक उभे केले. त्यावर पुन्हा निसर्गाचा कोप झाला. सोयाबीनवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे पीक बुडण्याच्या मार्गावर आहे. मर रोगाने तुरीची झाडे सुकत आहेत. कपाशीवरही रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांच्या फांद्या वाळत आहेत. हा शेतकऱ्यांना निसर्गाने दिलेला दुसरा धक्का. मध्यंतरी झालेल्या वादळी पावसामुळे पथ्रोट, पांढरी खानमपूर, अंजनगाव सुर्जी, परिसरातील काही केळीबागा भुईसपाट झाल्या. त्यामध्ये मोजक्याच बागाईतदारांच्या बागा सुदैवाने बचावल्या. पण, निसर्गाने त्यांच्यावर घाला घातलाच. शिल्लक राहिलेल्या केळीच्या बागांवर दव व अज्ञात रोगाने आक्रमण केले. यामुळे बागेतील लहान-लहान व अर्धवट पिकलेली केळी पिवळी व काळी पडली आहेत. झाडांवरील घडही तुटून पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हा तिसरा धक्का पोहचला आहे. संत्रा बागाईतदारांची स्थिती त्याहूनही बिकट आहे. वातावरणातील बदल व अज्ञात रोगामुळे मोर्शी, वरूड, चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सर्वच संत्रा बागांमधील हिरवी व पिवळी संत्री गळून पडू लागली आहेत. संत्रा हे रोखीचे पीक आहे. त्यामुळे या पिकाच्या भरवशावर मोठमोठे व्यवहार, कर्जांची देवाणघेवाण आदी केले जातात. मात्र, शासनाकडून नुकसान भरपाई देताना टाळाटाळ केली जाते. शेतकऱ्याला वरून निसर्गाचा व खालून शासनाचा मार सोसावा लागतो. ही शेतकऱ्यांची कुचंबणाच नाही काय, असा सवाल उपस्थित होत आहे.