अंजनगावात युवकाच्या घरी सापडला धारदार शस्त्रांचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:13 AM2021-07-25T04:13:17+5:302021-07-25T04:13:17+5:30

अंजनगाव सुर्जी, वनोजा बाग : शहरातील बालाजी प्लाॅटमधील एका २१ वर्षीय युवकाच्या घरी पाच तलवारी, आठ जांबीये व दोन ...

A stockpile of sharp weapons was found at the youth's house in Anjangaon | अंजनगावात युवकाच्या घरी सापडला धारदार शस्त्रांचा साठा

अंजनगावात युवकाच्या घरी सापडला धारदार शस्त्रांचा साठा

Next

अंजनगाव सुर्जी, वनोजा बाग : शहरातील बालाजी प्लाॅटमधील एका २१ वर्षीय युवकाच्या घरी पाच तलवारी, आठ जांबीये व दोन कट्यारी असा शस्त्रसाठा शनिवारी सापडला. अंजनगाव सुर्जी शहरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांनुसार, अंजनगाव पोलिसांना चेतन चंदू चंदनपत्री (२१, रा. बालाजी प्लॉट अंजनगाव सुर्जी) याच्याकडे शस्त्रसाठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून २४ जुलैला दुपारी १ वाजताच्या सुमारास चंदनच्या घरी अंजनगाव पोलिसांनी धाड टाकली. त्याच्या घरून पाच तलवारी, आठ जांबीये व दोन कट्यारी जप्त करून पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले. यापूर्वी विक्की वानखडे (२२) नामक युवकाने एका कॅन्टीनमध्ये तलवार हाती घेऊन बसलेला फोटो दोन दिवसांपूर्वी फेसबूकवर अपलोड केला होता. ही तलवार अजय अशोक आसलकर (२४, रा. काठीपुरा, अंजनगाव) याची होती. फोटो फेसबूकवर अपलोड होताच पोलीस उपनिरीक्षक सपकाळ यांनी शोध घेतला. विक्की वानखडे याच्याकडून पंच गजानन हुरपडे व श्रीकांत नाथे यांच्यासमक्ष नवीन बस स्टँडनजीक पारिख यांच्या पेट्रोल पंपजवळून एक तलवार जप्त करण्यात आली. विक्कीच्या बयाणावरून चेतन चंदनपत्री याच्या घराची झडती घेण्यात आली. चेतनच्या घरून चार तलवार व दहा निरनिराळे चाकू सापडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सपकाळ, मंजूषा ढोले व इम्रान इनामदार, पोलीस कॉन्स्टेबल पवन, सरफराज, वाहनचालक भूषण तयावाडे यांनी केली.

------------

शस्त्रे मागविली ऑनलाईन

याप्रकरणी विक्की वानखडे, अजय आसलकर, चंदू चंदनपत्री यांच्याविरुद्ध आर्म्स ॲक्ट ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला. चेतन ही शस्रे ऑनलाईन विकत घेत होता आणि त्याची विक्री गावात करीत असल्याचे आरोपींनी बयाण दिले. त्यावरून आणखीही शस्रे शहरात मिळून येण्याची चर्चा आहे.

---------------

चंदन योगपटू

चेतन चंदनपत्रीला काही दिवसाअगोदर ऑनलाईन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत योगासनांच्या प्रात्यक्षिकासाठी पुरस्कार मिळाला होता, हे विशेष. त्याला संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती विद्यापीठाचा कलरकोट प्राप्त आहे. त्याने अनेक योगास्पर्धा गाजवल्या आहेत. तो अलीकडे कट्टर धार्मिक संघटनेशी जुळल्याची चर्चा आहे.

Web Title: A stockpile of sharp weapons was found at the youth's house in Anjangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.