लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : अमरावती शहरातील एका मंगल कार्यालयात गुरुवारी रात्री ८ वाजता दोन तृतीयपंथीय विवाहबंधनात अडकले. या अनोख्या लग्नाची चांगलीच चर्चा होती. लग्नाकरिता राज्यभरातून तृतीयपंथीयांनी हजेरी लावली होती.शहरातील तृतीयपंथीयाचे नाशिक जिल्ह्यातील मनमाड तालुक्यातील नांदगावच्या तृतीयपंथियाशी विवाह सोहळा पार पडला. तत्पूर्वी प्रथेनुसार देवी रेणुका यल्लम्मा यांच्याशी विवाह लावण्यात आला. या लग्नासाठी पुणे, मुंबई, चाळीसगाव नागपूर, अमरावती तसेच खंडवा येथील तृतीयपंथीयांनी उपस्थिती दर्शविली.दरम्यान, बुधवारी वधूला हळद लागली, तर गुरुवारी डोलीतून मिरवणूक काढून तिला विवाहस्थळी आणण्यात आले. यावेळी नृत्याने जल्लोषात भर पडली. लग्न वºहाडींच्या जेवणावळीही उठल्या. तृतीयपंथीयांचा विवाह सोहळा अमरावतीकरांसाठी नावीन्याचा विषय असला तरी असे विवाह यापूर्वीही लागले आहेत, असे उपस्थितांनी सांगितले.
तृतीयपंथी अडकले विवाहबंधनात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:15 IST
अमरावती शहरातील एका मंगल कार्यालयात गुरुवारी रात्री ८ वाजता दोन तृतीयपंथीय विवाहबंधनात अडकले. या अनोख्या लग्नाची चांगलीच चर्चा होती. लग्नाकरिता राज्यभरातून तृतीयपंथीयांनी हजेरी लावली होती.
तृतीयपंथी अडकले विवाहबंधनात!
ठळक मुद्देशुभमंगल : राज्यभरातील तृतीयपंथी अमरावतीत