शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रात्री करायची चोरी, दिवसा त्याच पैशावर मज्जा; तीन सराईत घरफोडे जेरबंद 

By प्रदीप भाकरे | Updated: May 22, 2024 19:45 IST

पाच गुन्हे उघडकीस, जिल्ह्यासह तेल्हारा, अकोटला केली चोरी

अमरावती: एका गावात राहून रात्री घरफोडी व दिवसा त्या पैशांवर मौजमजा करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने २० मे रोजी अटक केली. त्यांच्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणून ५ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घरफोड्यांचा एक साथीदार फरार असून त्याचा कसून शोध सुरू आहे. तेजस संजय दरेकर (२२, रा. रवीनगर, कांडली, परतवाडा), वीरेंद्र सोभाराम नागेश्वर (४०, रा. किरपाणी, बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) व अमोल सुरेश देशमुख (३६, रा. मार्की, भातकुली) अशी अटक करण्यात आलेल्या घरफोड्यांची नावे आहेत. तर रोशन सरदार रा. परतवाडा असे फरार आरोपीचे नाव आहे.

वलगाव ठाण्याच्या हद्दीतील ग्राम मार्की येथे अमोल देशमुख याच्या घरी गेल्या काही दिवसांपासून अनोखळी तिघे राहत असून ते रात्रीच्या वेळी बाहेर जातात व दिवसा घरी असतात. ते पैशांची उधळण करून मौजमजा करतात, अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या पथकाने अमोल देशमुख याच्या घरी धाड टाकली. यावेळी तेथून तेजस दरेकर, वीरेंद्र नागेश्वर व अमोल देशमुख यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे घरफोडीसाठी वापरण्यात येणारे दोन पेचकस, टॉमी, सब्बल असे साहित्य मिळून आले. चौकशीत त्यांनी साथीदार रोशन सरदार रा. परतवाडा याच्यासोबत मिळून काही दिवसांपूर्वी अमरावती येथील श्री गजाननधाम, रेवसा, चांदूरबाजार, अकोट, शेगाव, तेल्हारा इत्यादी ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

कारागृहात झाली ओळखरोशन व तेजस हे दोघे मित्र असून काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात कारागृहात असताना त्यांची ओळख वीरेंद्र नागेश्वरसोबत झाली. कारागृहामधून सुटल्यावर ते वीरेंद्रच्या संपर्कात होते. त्यावेळी वीरेंद्रने तो मार्की येथे मित्र अमोल देशमुख याच्या घरी राहायला असल्याचे सांगितले. त्यामुळे रोशन व तेजस हे त्याला भेटण्यासाठी तेथे गेले. त्यावेळी अमोलचा मोठा भाऊ खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असल्याचे वीरेंद्रने त्यांना सांगितले. तेथून त्यांची ओळख होऊन चौघेही मार्की येथे राहत होते. ते दिवसा गावात राहायचे व रात्री चोरी करायचे, असे तपासात समोर आले. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता आहे.

यांनी केली कारवाईही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे, राजूआप्पा बाहेनकर, फिरोज खान, सतीख देशमुख, दिनेश नांदे, विकास गुडदे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, निवृत्ती काकड, रोशन माहुरे, किशोर खेंगरे यांनी केली.

टॅग्स :Amravatiअमरावतीtheftचोरी