शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुलींना 'इम्प्रेस' करण्यासाठी त्याने चोरली दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:34 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : शाळेतील बहुतांश मुले दुचाकीनेच येतात. आपल्याकडे ती नसल्यामुळे मुली लक्ष देत नाहीत, अशी खंत बाळगणाऱ्या एका अल्पवयीनाने त्यावर उपाय म्हणून दुचाकी चोरली आणि पोलिसांच्या क्राइम डायरीमध्ये आपल्या नावाची नोंद करून घेतली. फे्रजरपुरा हद्दीतून या अल्पवयीनास गाडगेनगर पोलिसांनी २७ नोव्हेंबरला ताब्यात घेतले होते. दुचाकीचोरीची तक्रार सोमवारी फ्रेजरपुरा पोलिसांकडे ...

ठळक मुद्देअल्पवयीन चोर : गाडगेनगर पोलिसांनी पकडले, पालकांना समजपत्र

आॅनलाईन लोकमतअमरावती : शाळेतील बहुतांश मुले दुचाकीनेच येतात. आपल्याकडे ती नसल्यामुळे मुली लक्ष देत नाहीत, अशी खंत बाळगणाऱ्या एका अल्पवयीनाने त्यावर उपाय म्हणून दुचाकी चोरली आणि पोलिसांच्या क्राइम डायरीमध्ये आपल्या नावाची नोंद करून घेतली. फे्रजरपुरा हद्दीतून या अल्पवयीनास गाडगेनगर पोलिसांनी २७ नोव्हेंबरला ताब्यात घेतले होते. दुचाकीचोरीची तक्रार सोमवारी फ्रेजरपुरा पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे.दहावीत शिकणाºया १५ वर्षीय अल्पवयीनाने फे्रजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील मालटेकडी परिसरातून २७ नोव्हेंबर रोजी दुचाकी चोरली. त्या दुचाकीवरील नंबर प्लेट त्याने काढली आणि शहरात बिनधास्त दुचाकी फिरवू लागला. गाडगेनगर पोलिसांनी विनाक्रमाकांची ही दुचाकी पकडून चौकशी केली असता, फे्रजरपुरा हद्दीतून चोरल्याचे उघड झाले.वडील दुचाकीने आॅफिसला जातात. कुठल्याही कामासाठी लगेच दुचाकी काढतात. मात्र, आपल्याला चालविण्यास मनाई करतात. शाळेतील मुले व मित्र दुचाकीने येतात. त्यांच्या दुचाकीवर मुली बसून जातात. मात्र, आपल्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही, ही बाब त्याच्या मनात घर करून बसली होती. यामुळे त्याने दुचाकीचा चोरण्याचा बेत आखला. तो मालटेकडीजवळ आला आणि हॅन्डल लॉक नसलेली दुचाकी पळविली.गाडगेनगर पोलिसांना हा प्रकार त्या अल्पवयीनाने सांगितला. तो अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्याच्या वडिलांना बोलावून समजपत्र दिले तसेच चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.फे्रजरपुरा हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीनास गाडगेनगर हद्दीत पकडण्यात आले. शाळेतील मित्र दुचाकीनेच येतात. वडील दुचाकी देत नाहीत. मुली बघत नाहीत, त्यांना इम्प्रेस करण्यासाठी दुचाकीचोरी केल्याची कबुली त्याने दिली.- मनीष ठाकरे, ठाणेदार