अमरावती : सोशल मीडियाचा अतिवापर हा आरोग्यासाठी घातक ठरणारा आहे. मोबाईलमुळे काही कुटुंबात कलह झाल्याच्या तक्रारी पोलिसांत पाेहोचल्या आहेत. सोशल मीडियामुळे नकारात्मक पसरत असल्याचे मत डॉ. प्रवीण देशमुख यांनी सांगितले. फेसबूक, व्हॉट्स ॲप, मॅसेंजर आदी सोशल मीडियापासून नागरिकांनी दोन हात दूर राहावे, असा सल्ला त्यांनी दिला.
-----------------
रोगावर नियंत्रण मिळविता येते
योग, व्यायामावर भर दिल्यास जीवनशैली नक्कीच बदल होतो. नियमित व्यायामाने विविध व्याधी दूर होते. रोगावर नियंत्रण ठेवणे सुकर होते. सक्षम भारत, सक्षम समाजनिर्मिती हा सुद्धा उद्देश पूर्ण करता येईल,असे विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक अविनाश असनारे यांनी सांगितले.
-------------
कोरोना काळात मानसिक रुग्णांत वाढ
गत वर्षभरात कोराेना काळात मानसिक रूग्णात वाढ झाली आहे. विशेषत: अभ्यासाच्या ताणाने काही विद्यार्थीदेखील नवे रुग्ण वाढले आहेत. कोरोनामुळे सर्व काही बंद झाले. शाळा, महाविद्यालयांना कुलूप लागले. त्यामुळे कोरोनाची धास्ती न बागळता आरोग्य जोपासण्यासाठी नियमित आहार घ्यावा, उन्हाळा असल्याने पोटभर पाणी प्यावे, ऋतुनिहाय फळांचा रस घ्यावा, असा सल्ला मानसोपचार तज्ञ्ज आशिष साबू यांनी सांगितले.