कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्या तरी पावसाळ्याचे दिवस बघता त्यांची दुरुस्ती आवश्यकतेनुसार करणे जरुरी असल्याने जिल्हा परिषद सर्कलमधील पथ्रोट, कासमपूर, वाल्मिकपूर, रामापूर, जावळापूर, कुंभी वाघोली, जनुना येथील शाळेत छत दुरुस्ती, भिंतींची दुरुस्ती, रंगरंगोटी, व्हरांडा फ्लॉवर, वॉल कंपाऊंड, लोखंडी गेट, खिडक्या दुरुस्ती, शिकस्त खोलीचे बांधकाम, पेविंग ब्लॉक बसविणे, जुनी जीर्ण इमारत पाडून नवीन वर्गखोली बांधणे आदींच्या कामाकरिता ३७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांना सदर निधी मंजूर करण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी प्रशांत गोरले, तालुका अध्यक्ष अतुल गिरणाळे, श्रीधर काळे, जयसिंग सोसायटीचे सभापती डॉ. अजय कडू आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळांच्या अंतर्गत बांधकामाकरिता अध्यक्षांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:10 IST