नेरपिंगळाई : शासनाने गतवर्षी २१ डिसेंबर २०१९ रोजी सर्व कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही तोडगा न काढल्याने ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) या संघटनेतर्फे विविध ३३ प्रश्नांचा उल्लेख असलेले निवेदन २१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्य सचिवांना सादर करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा शाखेचे सदस्य यशवंत वरूडकर, दीपक केदार, सोनपरोते, नीता सोमवंशी, मनीष पंचगाम, सोरते, नरेंद्र ढोलवाडे, टिकस, दाभाडे, सोनकांबळे, सोनकुसरे, देवा ढोके, राजेश ढोलवाडे, अनिल खर्चान, अशोक सातव, संतोष राणे उपस्थित होते.
____________
प्रति,
संपादक
..........
कृपया आपल्या वृत्तपत्र मध्ये वरील बातमी प्रसिद्ध करावी ही विनंती
दि . २३.१२.२०२०
(देवानंद ढोके)
कार्याध्यक्ष