शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका कायम, 20 पैकी 15 पक्ष्यांचे नमुने पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 04:20 IST

पुणे येथील पशुसंर्वधन रोग चाचणी विभागाच्या सहआयुक्तांनी २० मृत पक्ष्यांचे नमुने १२ जानेवारी रोजी भोपाळला पाठविले होते. प्रयोगशाळेच्या अहवालात विदर्भातील पॉझिटिव्ह मृत पक्ष्यांची संख्या कमी असली तरी ‘बर्ड फ्लू’चा धोका टळला नाही, हे सिद्ध होते. त्यामुळे महसूल, वने आणि पशुसंवर्धन विभाग ‘अलर्ट’ झाला आहे.

गणेश वासनिक -अमरावती: राज्य शासनाने चाचणीसाठी पाठविलेल्या मृत पक्ष्यांच्या २० नमुन्यांपैकी १५ नमुने पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद व राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थानने जारी केला. परिणामी, परदेशी स्थलांतरित पक्ष्यांमुळे ‘बर्ड फ्लू’चा धोका कायम असल्याचे चित्र आहे.पुणे येथील पशुसंर्वधन रोग चाचणी विभागाच्या सहआयुक्तांनी २० मृत पक्ष्यांचे नमुने १२ जानेवारी रोजी भोपाळला पाठविले होते. प्रयोगशाळेच्या अहवालात विदर्भातील पॉझिटिव्ह मृत पक्ष्यांची संख्या कमी असली तरी ‘बर्ड फ्लू’चा धोका टळला नाही, हे सिद्ध होते. त्यामुळे महसूल, वने आणि पशुसंवर्धन विभाग ‘अलर्ट’ झाला आहे. मृत पक्ष्यांची शोधमोहीम राबविण्यासाठी तालुकानिहाय ‘फ्लाईंग स्कॉड’ गठित करण्यात आले आहेत. ‘बर्ड फ्लू’ विषाणूचा प्रसार कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी किंवा मासे यापासून होत नाही, अशी जनजागृती केली जात आहे.

वनाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना पत्रवनाधिकाऱ्यांनी जंगल, व्याघ्र प्रकल्पात फिल्डवरील कार्यरत वनकर्मचाऱ्यांना जलाशय, तलावावर परदेशी अथवा स्थानिक पक्ष्यांवर लक्ष ठेवण्याबाबत सजग केले आहे. मृत पक्षी आढळल्यास त्याचे नमुने घेताना काळजी घ्यावी. पशुसंवर्धन विभागाला अवगत करूनच घटनास्थळी पंचनामा करावा, असे उपवनसंरक्षकांनी पत्राद्वारे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षकांना कळविले आहे.

या १५ ठिकाणचे नमुने पॉझिटिव्ह --   केंद्रवाडी, ता. आम्देपूर जि. लातूर (पोल्ट्री)-    सुकनी, ता. उदगीर जि. लातूर (पोल्ट्री)-    कुप्ता, रा. शेलू जि. परभणी (पोल्ट्री)-    पेडगाव, ता परभणी, जि. परभणी (पोल्ट्री)-    पापडवाडी (माहूर),ता. माहूर जि. नांदेड (पोल्ट्री)-    नवंध्याची वाडी, कंधार, जि. नांदेड (पोल्ट्री)-  मुळशी (चांदे),ता. मुळशी जि. पुणे (पोल्ट्री)-    दौंड (मौजे बेरीबे), ता. दौंड जि. पुणे (पोल्ट्री)-    मंगलवेढा, ता. मंगलवेढा जि. सोलापूर (पोल्ट्री)-    टोंडार (वंजरवाडी), ता. उदगीर जि. लातूर (पोल्ट्री)-    कांडला आर्णी, ता. आर्णी जि. यवतमाळ (मोर)-    श्रीगोंदा, जि. अहमदनगर (पोल्ट्री)-    कुर्डुवाडी, ता. औसा जि. लातूर (पोल्ट्री)-    लोखंङी शिवरगाव, ता. अंबेजोगाई जि. बीड (पोल्ट्री)-    आयपीडीबी, पेण जि. रायगड (पोल्ट्री)

 

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूAmravatiअमरावतीhospitalहॉस्पिटल