शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

राज्यातील महापालिकांना ‘स्वच्छ’ वॉर्ड स्पर्धेच्या निकालाचे ‘टेन्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:24 PM

राज्यातील सर्व महापालिका, नगर परिषद व नगरपंचायतमध्ये १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात आली. त्यामुळे चार हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणापाठोपाठ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छ वॉर्ड स्पर्धेच्या निकालाचे ‘टेन्शन’ आले आहे.

ठळक मुद्देअंतिम आठवड्यात त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणीआयुक्तांचा सीआर ठरणार

प्रदीप भाकरेअमरावती : राज्यातील सर्व महापालिका, नगर परिषद व नगरपंचायतमध्ये १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा घेण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ पाठोपाठ या स्पर्धेत उत्तम मानांकन मिळाल्यास प्रत्येक स्वच्छ प्रभागांवर लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. त्यामुळे चार हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणापाठोपाठ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छ वॉर्ड स्पर्धेच्या निकालाचे ‘टेन्शन’ आले आहे. दैनंदिन स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापानाबाबत यथातथा असणाऱ्या विदर्भातील बहुतांश महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांना निकालाची प्रतीक्षा लागून राहिली असून, या दोन्ही स्पर्धेच्या यशापयाशावर त्यांचा ‘सीआर’ ( वार्षिक गोपनिय अहवाल) अवलंबून आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभागी होण्यास लोकांना उद्युक्त करणे, हगणदारीमुक्त व स्वच्छता याबाबत शहरांची क्षमता कायमस्वरूपी वाढविणे तसेच स्वच्छ महाराष्ट्राच्या दिशेने वाटचालीत समाजातील सर्व घटकातील लोकांचा सांघिक सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा राबविण्यात आली.शहराचे ‘स्वच्छ’ मानांकन ठरविणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणाची तपासणी ४ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत आटोपली. त्यासोबतच नागरी स्थानिक संस्थांमध्ये ‘स्वच्छ वॉर्ड स्पर्धा’ घेण्यात आली. स्पर्धेत शहरातील प्रत्येक वॉर्डाचा सहभाग अनिवार्य होता. त्यानुसार संबंधित नगरसेवकांना विश्वासात घेऊन या स्पर्धेविषयी प्रथम जनजागृती करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षणाची तयारी जोरात सुरू असताना वॉर्डावॉर्डात ‘स्वच्छ वॉर्ड’ स्पर्धेची माहिती देण्यात आली. सोबतच स्पर्धेच्या निकषांप्रमाणे मोहिम राबविण्यात आली. त्याचा निकाल एप्रिलमध्ये लागणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणाव्यतिरिक्त दुसऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रशासन मात्र चांगलेच घायकुतीस आले होते. या स्पर्धेत प्रत्येक वॉर्डाला सहभागी होणे अनिवार्य असल्याने प्रत्येक नगरसेवकाचीही मदत घेण्यात आली.‘अ’ व ‘ब’ वर्ग महापालिका क्षेत्रातील प्रथम, द्वितीय व तृतीय स्वच्छ वॉर्डाला अनुक्रमे ५० लाख, ३५ लाख व २० लाख रुपये मिळतील. ‘क’ व ‘ड’ वर्ग महापालिकांना ३० लाख, २० लाख व १५ लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे. या स्पर्धेचे त्रयस्थ यंत्रणेकडून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तपासणी करण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालानंतर स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचे मानकरी ठरतील.असे होईल गुणांकनघरोघरी जाऊन कचरा संकलन पद्धती अवलंबविणाऱ्या घरांचे प्रमाण, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण, वॉर्डात ओल्या कचऱ्यावर विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया, नेहमी कचरा दिसणाऱ्या ठिकाणचे सुशोभीकरण, सर्व घरांमध्ये वैयक्तिक शौचालये, सामुदायिक, सार्वजनिक शौचालयांची स्थिती, नगरसेवकांनी घेतलेले जनजागृती कार्यक्रम, श्रमदान, १०० टक्के मालमत्ता कर संकलन, वॉर्डातील प्लास्टिक बंदीची स्थिती, स्वच्छतेबाबत फलके, लोकसहभाग या विविध निकषांवर त्रयस्थ संस्था स्वच्छ प्रभागाचे गुणांकन करणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका