लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष सुरक्षा विभागाची आढावा बैठक मंगळवारी स्थानिक आशियाना क्लब येथे पार पडली. विशेष सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांची बैठकीला उपस्थिती होती. कृष्णप्रकाश हे व्हीआयपी सिक्युरिटीजचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.अमरावतीसह विभागातील अकोला, यवमताळ, वाशिम, बुलडाणा या पाचही जिल्ह्यांचे विशेष शाखेचे अधिकारी आणि राज्य व गुप्तचर विभागाचे अधिकारी मंगळवारी बैठकीला उपस्थित होते. यावेळी कृष्णप्रकाश यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्याच्या अनुषंगाने घडामोडींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक राहिलेल्या कृष्णप्रकाश यांनी बैठकीनंतर अंबा-एकवीरा देवीचे दर्शन घेतले.
राज्य गुप्तचर विभागाची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:30 IST
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष सुरक्षा विभागाची आढावा बैठक मंगळवारी स्थानिक आशियाना क्लब येथे पार पडली. विशेष सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांची बैठकीला उपस्थिती होती. कृष्णप्रकाश हे व्हीआयपी सिक्युरिटीजचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
राज्य गुप्तचर विभागाची आढावा बैठक
ठळक मुद्देकृष्णप्रकाश यांच्याकडून निर्देश