शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
5
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
6
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
7
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
8
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
9
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
10
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
11
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
12
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
13
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
14
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
15
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
17
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
18
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
19
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
20
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...

राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 05:00 IST

पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ आलेल्या बळीराजाला राज्य शासनाने भरभक्कम आधार द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्या गुरुवारी अमरावती व चांदूर बाजार तालुका दौऱ्यावर आहेत. त्यांनी ठिकठिकाणी पिकांची पाहणी केली. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वना केली.

ठळक मुद्देनवनीत राणा यांनी घेतली कृषक कुटुंबांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासन व महावितरणच्या  उदासीन धोरणांमुळे शेतकऱ्यांप्रति संवेदनहीन दुर्लक्षामुळे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा सदस्य प्रकाश साबळे यांच्यासमवेत भेट घेण्यात आली. मानसिक आधार, कुटुंबीयांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असून, सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन खा. नवनीत राणा यांचे केले.पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ आलेल्या बळीराजाला राज्य शासनाने भरभक्कम आधार द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्या गुरुवारी अमरावती व चांदूर बाजार तालुका दौऱ्यावर आहेत. त्यांनी ठिकठिकाणी पिकांची पाहणी केली. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वना केली. गोपाळपूर येथील राजकुमार गंगोले हे भूमिहीन शेतकरी रखवाली करीत असताना विजेच्या धक्क्याने दगावले. त्यांच्या पश्चात दोन मुले व मुलगी आहे. अंगोला, टाकळी जहागीर येथील गजानन महादेवराव बोधडे (४०) यांचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असून, ते साडेतीन एकर शेतीच्या भरवशावर जगत आहे. या दोन्ही कुटुंबीयांना महावितरण कंपनीने तात्काळ मदत द्यावी, असे निर्देश खासदार नवनीत राणा यांनी मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांना दिले. शिराळा येथील मनोहर शंकर गोडगोमे यांनी २२ जून रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन लहान मुली आहेत. त्यांच्याकडे पाच एकर शेती असून, त्यांचेवर बँक ऑफ बडोदाचे तीन लाखांचे कर्ज होते. या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. आकस्मिक मृत्यू झालेल्या नीलेश गभने यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. चांदूर बाजार तालुक्यातील बेसखेडा येथील १० एकर शेती असलेल्या सचिन वाटाणे यांनी तहसीलदार कार्यालयात विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला होता. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचीसुद्धा खा. राणा यांनी भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे, तहसीलदार काकडे, तालुका कृषी अधिकारी कावने, मंडळ अधिकारी गावणेर, चांदूर बाजारचे नायब तहसीलदार बढिये, मंडळ अधिकारी उगले, सरपंच महल्ले, पवन बैस, चंदा लांडे, सचिन सोनोने, मंगेश कोकाटे, हरकूट, सागर पारधी, आशुतोष मोहोड, प्रीतम काळे, राजेश सुंडे, अनिल शेळके आदी उपस्थित होते.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणा