शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

जुळ्या शहरात व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा सुळसुळाट

By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST

व्हॉटस अ‍ॅपवर अनेक ग्रुप तयार होतात आणि ते सक्रियही असतात. त्यातील विधायक कामांसाठी उभे राहणारे गु्रप कमी असतात.

प्रतिष्ठांचाही समावेश : ग्रुप तयार करण्यासाठी कमालीची चढाओढसुनील देशपांडे अचलपूरव्हॉटस अ‍ॅपवर अनेक ग्रुप तयार होतात आणि ते सक्रियही असतात. त्यातील विधायक कामांसाठी उभे राहणारे गु्रप कमी असतात. त्यावर मिळणारा प्रतिसादही मर्यादीतच दिसतो. ग्रुपचे सदस्य मानव हिताचे विचार मांडण्यासाठी कमी व एखाद्या जाती धर्माविरुध्द पछाडलेल्यासारखे मत व्यक्त करताना दिसतात. एखाद्या व्यक्तिला किंवा धर्माला टार्गेट करून त्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकतात. असाच प्रकार एका गु्रुपवर घडल्यानंतर बाकी ग्रुपमधील धर्मवेडे असलेले सदस्य काही धडा घेतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लिखित संवाद साधण्याचे आपले विचार मते सहजतेने पोहोचविणारे आणि छायाचित्र व चित्रफीत अगदी सहजतेने पोहचविणारे सशक्त माध्यम म्हणून व्हॉट्स अ‍ॅप हे सोशल मीडियासमोर आले आहे. अचलपुरात व्हॉटस अ‍ॅपवर ग्रुप तयार करण्याची स्पर्धाच सुरू आहे. अनेक ग्रुपमध्ये त्याच त्या मंडळींचाही सहभाग असतो. त्यासुध्दा ग्रुप बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. गु्रपमध्ये नामांकित व्यक्ती पत्रकार, नगरसेवक, पुढारी, नेतेमंडळी, मोठ-मोठे अधिकारी असणे त्या ग्रुप अ‍ॅडमिनला प्रतिष्ठेचे वाटत असावे, यामुळे तो सदर मंडळींचा समावेश करतो. परंतु यातील एखादा सदस्य एखाद्या जातीविरुद्ध किंवा धर्माविरुध्द आक्षेपार्ह पोस्ट टाकून सदर जाती-धर्मातील लोकांच्या भावना दुखावत असते. बहुतांशी यासंबंधी तक्रार केली जात नसली तरी ती पोस्ट बाकी सदस्यांना मन:स्ताप देणारी ठरत असते. त्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपरवर ग्रुप तयार करावी तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी व्हॉट्स अ‍ॅपचे ग्र्रुप तपासण्याची यंत्रणा कार्यान्वित करून ज्यांना ग्रुप तयार करायचे त्यांनी अगोदर साची लेखी माहिती पोलीस ठाण्याला दिल्यास आक्षेपार्ह मजकुरांवर अंकुश बसू शकतो. निवडणुकीवर डोळा ?नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात अचलपूर नगर पालिकेच्या निवडणुका आहेत. त्यासाठी अनेक इच्छूक उमेदवार चर्चेत राहण्यासाठी व निवडणुकीत मते ओढण्यासाठी वेगवेगळे समजसेवेच्या नौटंकी राजकारण करत आहे. काही जण जाती धर्माच्या नावाचे राजकारण करीत आहेत. काही धार्मिक भावना भडकावून आपली राजकीय पोळी शेकण्याच्या प्रयत्नात आहेत. रफीकसेठ यांनी झाल्या चुकीचा माफीनामा ग्रुपवर टाकला असला तरी त्यांचे परिणाम राजकारणात व येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत उमटतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. राजकारण ढवळून निघालेरफीकसेठ ‘लोकशाही’ नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे सदस्य आहेत. त्या ग्रुपवर त्यांनी गुरुवारी रात्री हिंदू-देव देवतांबद्दल अश्लील, अवमानकारक व आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने शुक्रवारी अचलपूर-परतवाड्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यावर संताप व्यक्त करी सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली आहे. त्या मजकुराबद्दल रफीकसेठ यांनी माफीनामा टाकला असला तरी परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये ग्रुप अ‍ॅडमीन नरेश तायवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध भादंविच्या २९५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.