अमरावती : इयत्ता ११वीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील शेवटची यादी जाहीर झाली असून सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ९ हजार ३५५ प्रवेश क्षमतापैकी ५ हजार ९६२ विद्यार्थ्यांची प्रवेशाची लगबग सोमवारपासून शहरातील विविध महाविद्यालयांत पाहायला मिळणार आहे.स्थानिक विमलाबाई देशमुख महाविद्यालयात शुक्रवारी केंद्रीय प्रवेश समितीने पत्रपरिषद आयोजित केली होती. यावेळी अकरावी प्रवेश प्रक्रियेतील शेवटची यादी शनिवारी जाहीर केली जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार शनिवारी अंतिम यादी जाहीर झाली. यावेळी समिती अध्यक्ष सत्यनारायण लोहिया, प्राचार्य एफ.सी. रघुवंशी, सचिव अरविंद मंगळे, अमरसिंग राठोड, के.के. चित्तालिया, फैजल इकबाल, श्रीकांत देशपांडे, विजय भांगडीया, विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेचे अजय बोरसे आदीची उपस्थिती होती. यावर्षी अकरावी प्रवेशाकरिता केंद्रीय समितीकडे कला शाखेत २८८५ क्षमतेपैकी ८९२, वाणिज्य शाखेत १४७५ पैकी ११८६ व विज्ञान शाखेत ४९९५ पैकी ४८६४ प्रवेश क्षमता निश्चित झाली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा अधिक कल वाणिज्य व विज्ञान शाखेकडे दिसून आला आहे. सद्यस्थितीत वाणिज्य शाखेत ३० टक्के जागा शिल्लक असून विज्ञान शाखेत केवळ ३ टक्के जागा रिक्त आहेत. या प्रवेश प्रक्रियेमध्ये १७८३ विद्यार्थ्यांना पंसतीक्रम न मिळाल्याने त्यांच्या प्रवेशाकरिता अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र या विद्यार्थ्यांकरिता प्रवेश प्रक्रिया ३० जुलैनंतर निश्चित केली जाणार आहे.जागा ४८ इच्छुक, विद्यार्थी १७८३यावर्षी बारावीचा निकाल चांगला लागल्याने विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे दिसून येत आहे. मात्र सद्यस्थितीत विज्ञान शाखेच्या ४८ जागा शिल्लक असून त्याकरिता १७८३ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. या सर्व जागा फ्रेंडस उर्दू कॉलेज याच्याच आहे.
आजपासून ११वीच्या प्रवेशाकरिता लगबग
By admin | Updated: July 20, 2014 23:57 IST