शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांविना शाळांना प्रारंभ; शिक्षक हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

दरवर्षी राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या दिवशी शाळेच्या नविन शैक्षणिक सत्राला सुरुवात होते. यात यंदा कोरोनाच्या महासंकटात शाळेची घंटा वाजली. परंतु, विद्यार्थी आले नाही. शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये पालक वर्गाच्या समस्या जाणून घेऊन अशा पद्धतीने विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. इतिहासात कधी अशा पद्धतीने शाळा सुरू झाली नसावी.

ठळक मुद्देपालक संघाची सभा : कोरोनाच्या सावटात सत्राला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कभातकुली : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची लगबग असते. पण, यंदा वा आतापर्यंत पहिल्यांदाच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी सोडून शिक्षक व पालकांची हजेरी लागलेली दिसत होती. कोरोनाच्या प्रादुर्भावाने शाळेचा पहिला दिवस पालक संघांच्या सभांनी पार पडला.दरवर्षी राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या दिवशी शाळेच्या नविन शैक्षणिक सत्राला सुरुवात होते. यात यंदा कोरोनाच्या महासंकटात शाळेची घंटा वाजली. परंतु, विद्यार्थी आले नाही. शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये पालक वर्गाच्या समस्या जाणून घेऊन अशा पद्धतीने विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. इतिहासात कधी अशा पद्धतीने शाळा सुरू झाली नसावी. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटात शाळा कधी सुरू होणार, याची अनिश्चितता होती. मात्र, शिक्षण विभागाने गतवर्षी केलेल्या नियोजनानुसार २६ जून रोजी शाळा सुरु झाल्या. परंतू शाळेत विद्यार्थी नव्हते. २३ मार्चपासून बंद असलेल्या शाळेत शिक्षकांची उपस्थिती मात्र दिसून आली. शुक्रवारी शिक्षण शाळेत दाखल झाल्याचे चित्र सर्वत्र होते. पण, विद्यार्थी नाही, असा विचित्र अनुभव पहिल्यांदाच शिक्षकांना आला. कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. त्याचा थेट प्रभाव जनजीवनावर झाला आहे. शुक्रवारी सर्वप्रथम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकाच्या उपस्थितीत सुरू झाल्या.राज्य शासनाच्या १५ जूनच्या परिपत्रकानुसार, शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. शाळेत मुलांना बोलवायचे की नाही, याचा अंतिम निर्णय झाला व्यवस्थापन समितीला दिला आहे. इयत्ता नववी व दहावी आणि बारावीचे वर्ग १ जुलैपासून, तर इयत्ता सहावी ते नववीचे वर्ग ऑगस्टमध्ये आणि इयत्ता तिसरी व चौथीचे वर्ग सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. इयत्ता पहिली व दुसरीसंदर्भात मात्र अजूनही निर्णय झाला नाही. विशेष म्हणजे, ज्यांच्या शाळा प्रवेशाची सर्वाधिक घाई असते, त्या किंडरगार्टन सुरू करण्याबाबत प्रशासन स्तरावर काहीही उल्लेख केलेला नाही.कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद; पण शिक्षण सुरु असा आॅनलाईन उपक्रम राज्यस्तरावर राबविला जात आहे. शाळेत मुले नाहीत; मात्र त्यांना डिजिटल अ‍ॅपद्वारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे.- गजानन लेंडेप्राचार्य, भातकुली

टॅग्स :Schoolशाळा